• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. raj thackeray letter to all party leaders amid kasaba pimpri chinchwad bypoll pune pbs

“…तर, जनतादेखील सहानभूती दाखवेलच असं नाही”, राज ठाकरेंचा सर्वपक्षीयांना लिहिलेल्या पत्रात सूचक इशारा

राज ठाकरेंनी विद्यमान लोकप्रतिनिधीचं निधन होतं तेव्हा तिथे होणारी पोटनिवडणूक शक्यतो बिनविरोध करावी, असं आवाहन केलं आहे. या पत्रात राज ठाकरे नेमकं काय म्हणाले याचा हा आढावा…

Updated: February 6, 2023 10:41 IST
Follow Us
  • पिंपरी चिंचवड-कसबा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी (५ फेब्रुवारी) सर्वपक्षीय नेत्यांना उद्देशून एक पत्र लिहिलं आहे.
    1/18

    पिंपरी चिंचवड-कसबा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी (५ फेब्रुवारी) सर्वपक्षीय नेत्यांना उद्देशून एक पत्र लिहिलं आहे.

  • 2/18

    या पत्रात राज ठाकरेंनी विद्यमान लोकप्रतिनिधीचं निधन होतं तेव्हा तिथे होणारी पोटनिवडणूक शक्यतो बिनविरोध करावी, असं आवाहन केलं आहे.

  • 3/18

    तसेच सर्वपक्षीयांना एक सूचक इशाराही दिला.

  • 4/18

    या पत्रात राज ठाकरे नेमकं काय म्हणाले याचा हा आढावा…

  • 5/18

    महाराष्ट्र विधानसभेच्या २ आमदारांचं नुकतंच दुःखद निधन झालं – राज ठाकरे

  • 6/18

    या निधनामुळे रिक्त झालेल्या विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिडणुका होत आहेत – राज ठाकरे

  • 7/18

    मी अगदी सुरुवातीपासून या मताचा आहे की, जेव्हा एखाद्या विद्यमान लोकप्रतिनिधीचं निधन होतं तेव्हा तिथे होणारी पोटनिवडणूक शक्यतो बिनविरोध करावी – राज ठाकरे

  • 8/18

    कारण मुळात जसा त्या विधानसभेतील कौल लोकप्रतिनिधीला असतो, तसाच कौल त्याच्या पक्षालादेखील असतो – राज ठाकरे

  • 9/18

    अनेकदा त्या पोटनिवडणुकीत उमेदवार हा मृत व्यक्तीच्या घरातील असतो – राज ठाकरे

  • 10/18

    अशावेळेस पक्षाने जर मृत व्यक्तीच्या घरातील उमेदवार दिला असेल तर, त्या उमेदवाराला बिनविरोध निवडून देणं ही एक प्रकारे, राजकीय संस्कृतीने त्या निधन झालेल्या व्यक्तीला श्रद्धांजलीच ठरणार नाही का? – राज ठाकरे

  • 11/18

    ही प्रगल्भता महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन नाही – राज ठाकरे

  • 12/18

    अर्थात उमेदवार जर निधन पावलेल्या लोकप्रतिनिधीच्या घरातील नसेल तर, जनता देखील सहानभूती दाखवेलच असं नाही – राज ठाकरे

  • 13/18

    अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या वेळेस, दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी शिवसेनेच्या तिकिटावर उभ्या होत्या. त्यावेळेस मी देवेंद्र फडणवीस यांना निवडणूक बिनविरोध करण्याचं आवाहन केलं होतं – राज ठाकरे

  • 14/18

    या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत, त्यांनी ती निवडणूक बिनविरोध होऊ दिली – राज ठाकरे

  • 15/18

    आता पुन्हा पिंपरी-चिंचवड आणि कसबा विधानसभांमध्ये पोटनिवडणूका होत आहेत – राज ठाकरे

  • 16/18

    जो उमदेपणा भारतीय जनता पक्षाने दाखवला तोच उमदेपणा महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही दाखवावा – राज ठाकरे

  • 17/18

    महाराष्ट्राची राजकीय संस्कृती प्रगल्भ आहे हे देशाला दाखवून देण्याची संधी आपल्याला सर्वांना आहे – राज ठाकरे

  • 18/18

    हीच नाही तर एकूणच अशा दुःखद घटनांमुळे होणाऱ्या पोटनिवडणुका बिनविरोध कराव्यात ही इच्छा – राज ठाकरे

TOPICS
पुणेPuneमनसेMNSराज ठाकरेRaj Thackeray

Web Title: Raj thackeray letter to all party leaders amid kasaba pimpri chinchwad bypoll pune pbs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.