-
गेल्या महिन्याभरापासून चर्चेत असलेल्या कसबा पोटनिवणुकीचा निकाल आज लागला. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा विजय झाला आहे.
-
भाजपा उमेदवार हेमंत रासने यांच्यांशी झालेल्या चुरशीच्या लढतीत धंगेकरांनी बाजी मारली.
-
या निवडणुकीसाठी ‘बिग बॉस’ फेम अभिजीत बिचुकले यांनीही अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला होता.
-
परंतु, अभिजीत बिचुकलेंचा या निवडणुकीत दारुण पराभव झाला आहे. कसब्यातील पोटनिवडणुकीत बिचुकलेंना केवळ ४७ मते मिळाली आहेत.
-
कसबा पोटनिवडणुकीच्या निकालानंतर अभिजीत बिचुकलेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
-
‘एबीपी माझा’शी बोलताना बिचुकलेंनी त्यांना मिळालेल्या ४७ मतांबाबत भाष्य केलं.
-
“तो जनतेचा प्रश्न आहे. तो माझा प्रश्न नाही. मला मत का नाही दिलं? असं आम्ही जनतेला जाऊन विचारू शकत नाही. राजेशाही असती तर त्यांना दाखवलं असतं. भारतात लोकशाही आहे”, असं बिचुकले म्हणाले.
-
भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या कसब्यात तब्बल २८ वर्षांनंतर काँग्रसेची सत्ता आली यावरही अभिजीत बिचुकलेंनी प्रतिक्रिया दिली.
-
“कसब्यातील भाजपाची सत्ता काँग्रेसला गेली, हा माझा पायगुणच” असं अभिजीत बिचुकले म्हणाले.
-
“मी जिंकलो नाही पण रासनेंचा व देवेंद्र फडणवीसांचा पराभव झाला”, असंही पुढे ते म्हणाले.
-
पुढे ते म्हणाले, “लोकशाहीचा मार्ग जिवंत ठेवण्यासाठी मी निवडणूक लढतो. शर्यत असून संपलेली नाही. कारण मी अजून जिंकलो नाही”.
-
“डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचाही पराभव झाला होता. माझं खातच अजून उघडलेलं नाही. १४ आमदारांवरुन एका आमदारावर येण्यापेक्षा मी थेट १५० आमदार घेऊन येणार”
-
“आता २०२४ विधानसभा निवडणूक हे माझं पुढील मिशन आहे. या निवडणुकीत पूर्ण विधानसभा जिंकून अलंकृता बिचुकले या पहिल्या महिला मुख्यमंत्री असतील”, असं म्हणत बिचुकलेंनी २०२४ वर्षातील निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं आहे.
-
(सर्व फोटो:लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
“हा माझा पायगुण” कसब्यात काँग्रेसची सत्ता आल्यानंतर अभिजीत बिचुकलेंची प्रतिक्रिया, म्हणाले “देवेंद्र फडणवीसांचा पराभव…”
Kasba Bypoll Election Result 2023: ‘बिग बॉस’ फेम अभिजीत बिचुकलेंची प्रतिक्रिया
Web Title: Kasba bypoll election 2023 abhijeet bichukale commented on bjp loss devendra fadnavis congress ravindra dhangekar win kak