-
शिवसेनेच्या (ठाकरे गट) उपनेत्या आणि प्रवक्त्या सुषमा अंधारे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोरच अश्रू अनावर झाले.
-
शरद पवार यांच्यासमोर भाषण करताना सुषमा अंधारेंनी दिल्लीत घडलेली एक घटना सांगितला. हे सांगताना त्या भावनिक झाल्या आणि ढसाढसा रडल्या.
-
यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यामुळेच माझं संपूर्ण कुटुंब सुरक्षित असल्याचंही नमूद केलं.
-
त्या मंगळवारी (९ मे) साताऱ्यात भारतीय भटके विमुक्त विकास व संशोधन संस्थेच्या फुले आंबेडकर साहित्य पंचायत पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होत्या. त्याचा हा आढावा…
-
इथं राजकारणाचा विषयच नाही, पण आवर्जून सांगणं गरजेचं आहे. आमदार अश्लाघ्य पद्धतीने माझ्याबद्दल टीपण्णी करतात आणि एकाही पोलीस स्टेशनला त्याची तक्रार लिहून घेतली जात नाही – सुषमा अंधारे
-
सभागृहात आपण सगळे विरोधी पक्षनेते म्हणून बाकावर बसतो. तेव्हा विरोधी पक्षाच्या नेत्यांनी माझ्यावरील अश्लाघ्य वक्तव्याविरोधातील तक्रार का नोंदवली नाही असा प्रश्न विचारायला हवा होता – सुषमा अंधारे
-
माझं चुकत असेल तर तुम्ही कान पकडा, मी लाख वेळा माफी मागायला तयार आहे. कारण मी तुमच्याकडे हक्काने बोललंच पाहिजे – सुषमा अंधारे
-
शरद पवारांना लोक आधारवड म्हणतात. त्यांनी राजीनामा दिल्यावर मी जे पत्र लिहिलं होतं तेच मी वाचणार आहे – सुषमा अंधारे
-
संजय राऊतांनी या पत्राची प्रिंट काढून पवारांना दिल्याचं मला सांगितलं गेलं. मात्र, हे पत्र मी पुन्हा एकदा वाचून दाखवलं पाहिजे – सुषमा अंधारे
-
मला शरद पवार यांचा राजीनामा नको होतो, म्हणून मी हे पत्र लिहिलं होतं – सुषमा अंधारे
-
खरंतर मी शरद पवार यांना लिहावं किंवा सांगावं एवढी प्रज्ञा माझी निश्चितच नाही. मात्र, केवळ पक्ष म्हणून नाही, तर महाराष्ट्रातील बहुजन, उपेक्षित तळागाळातील अठरापगड जातीची बुज जाण असणाऱ्या कुणालाही पवारांचा राजीनामा मानवणार नाही – सुषमा अंधारे
-
मी सभागृहात सांगू शकणार नाही की शरद पवारांनी माझ्यासारखी अत्यंत तळागाळातून आलेल्या मुलीसाठी काय केलं आणि काय नाही – सुषमा अंधारे
-
शरद पवारांमुळे माझं संपूर्ण कुटुंब सुरक्षित दिसतं आहे. अनेक नेत्यांनी चार चार महिन्यांनी माझे मेसेज बघितले – सुषमा अंधारे
-
मात्र, मी शरद पवारांना मेसेज केल्यावर त्यांचे स्वीय सहायक सतीश राऊत यांनी अगदी मोठ्या भावासारखा फोन केला आणि शरद पवारांपर्यंत माहिती पोहचवली – सुषमा अंधारे
-
माझ्या एका फोननंतर पुढील ६ तासात मी दिल्लीत शरद पवारांसमोर हजर होते – सुषमा अंधा
-
शरद पवारांनी माझं म्हणणं ऐकून घेतलं. कुटुंबप्रमुख भेटल्याप्रमाणे मी स्वतःला आवरू शकले नाही आणि अक्षरशः शरद पवारांसमोर रडले – सुषमा अंधारे
-
त्यांनी मला तातडीने तिथून मुंबईला पाठवलं. याचा संदर्भ शरद पवारांना आणि मला माहिती आहे – सुषमा अंधारे
-
पत्र लिहिल्यापासून एका तासात शरद पवार माझ्याशी फोनवर बोलले. मात्र, आम्ही इतके भावनिक होतो की, तुम्ही काय म्हणत आहात हेही ऐकून घेई शकत नव्हतो – सुषमा अंधारे
-
आत्ता जे आमदार म्हणून निवडून आलेले लोक आहेत, जे शिंदे गटातील आहेत आणि बायकांविषयी अत्यंत हिणकस दृष्टीकोन बाळगतात, अश्लाघ्य पद्धतीने बोलतात – सुषमा अंधारे
-
बाई म्हणजे पायातील वहाण आहे असं वागतात. मग तो सत्तार असेल, शिरसाट असेल किंवा कुणीही असेल या सगळ्यांमध्ये प्रचंड मनुवादी विचार वाढलेला आहे – सुषमा अंधारे
-
त्यांना सत्तेवरून खाली खेचायला हवं, त्यासाठी महाविकासआघाडी हवी आणि मविआसाठी शरद पवार असायला हवेत – सुषमा अंधारे
-
शरद पवार आहेत म्हणून मविआची मुठ बांधलेली आहे. म्हणून शरद पवार अध्यक्ष हवेत – सुषमा अंधारे (सर्व छायाचित्र सौजन्य – फेसबूक)
सुषमा अंधारे शरद पवारांसमोर का रडल्या? नेमकं काय घडलं? स्वतःच सांगितला घटनाक्रम…
शिवसेनेच्या (ठाकरे गट) उपनेत्या आणि प्रवक्त्या सुषमा अंधारे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोरच अश्रू अनावर झाले.
Web Title: Sushma andhare comment on sharad pawar tell emotional incidence pbs