• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. pankaja munde say will meet amit shah and discuss with him pbs

“मी अमित शाहांची भेट घेणार आणि…”, पंकजा मुंडे जाहीर भाषणात म्हणाल्या, “मी बिनधास्त…”

पंकजा मुंडेंनी शनिवारी (३ जून) गोपीनाथ गडावर भाषण करताना थेट अमित शाहांना भेटण्याबाबत सुतोवाच केलं. यानंतर चर्चांना आणखी उधाण आलं. त्यांनी नेमकं काय म्हटलं त्याचा हा आढावा…

June 3, 2023 21:30 IST
Follow Us
  • भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्या नाराजीची जोरदार चर्चा आहे.
    1/25

    भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्या नाराजीची जोरदार चर्चा आहे.

  • 2/25

    त्यांच्या पक्षांतराबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

  • 3/25

    विरोधकांकडून याच मुद्द्यावर भाजपावर टीका होत आहे, तर दुसरीकडे भाजपा नेत्यांकडून पंकजा मुंडे नाराज नसल्याचा दावा केला जात आहे.

  • 4/25

    अशातच आता स्वतः पंकजा मुंडेंनी शनिवारी (३ जून) गोपीनाथ गडावर भाषण करताना थेट अमित शाहांना भेटण्याबाबत सुतोवाच केलं.

  • 5/25

    यानंतर चर्चांना आणखी उधाण आलं आहे. पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या त्याचा हा आढावा…

  • 6/25

    मी राजकारणात जी भूमिका घेईन, ती छातीठोकपणे घेईन – पंकजा मुंडे

  • 7/25

    मी आज ३ जून २०२३ पर्यंत ज्या भूमिका जाहीरपणे मांडल्या त्याच भूमिकेंशी मी ठाम आहे – पंकजा मुंडे

  • 8/25

    विरोधकांना किंवा माध्यमांना संभ्रम निर्माण करण्याची संधी मी दिलेली नाही – पंकजा मुंडे

  • 9/25

    अनेक लोक निवडणूक हरले, मात्र त्यांना संधी दिली गेली – पंकजा मुंडे

  • 10/25

    गेल्या चार वर्षात दोन डझन आमदार-खासदार झालेत. त्याला मी पात्र होत नसेल तर लोक चर्चा करणारच. ती चर्चा मी ओढावलेली नाही – पंकजा मुंडे

  • 11/25

    असं असलं तरी माझ्या मनात गाढ विश्वास आहे. अमित शाह माझे नेते आहेत – पंकजा मुंडे

  • 12/25

    मी अमित शाहांची भेट घेणार आहे. मी त्यांच्याकडे वेळ मागितला आहे – पंकजा मुंडे

  • 13/25

    मी त्यांच्याशी मनमोकळं बोलणार आहे आणि त्यांना विचारणार आहे. कारण आता माझे वडील जीवंत नाहीत – पंकजा मुंडे

  • 14/25

    माझं नेतृत्व करावं असा एक व्यक्ती मला सापडला आहे. मी त्यांच्याशी बोलणार आहे – पंकजा मुंडे

  • 15/25

    हितचिंतक खूप आहेत. दुसऱ्या पक्षातही माझे हितचिंतक आहेत. ते सर्व जे बोलले त्यांचे मी आभार मानते – पंकजा मुंडे

  • 16/25

    मी रडगाणं गाणारी नाही. रडगाणं रोज गावं लागतं. बाप मेला तरी मी डोळ्यात अश्रू येऊ दिले नाहीत. मी रडायचं नाही अशी शपथ घेतलेली व्यक्ती आहे – पंकजा मुंडे

  • 17/25

    मला तुमच्या सर्वांसमोर हे स्पष्टपणे सांगायचं आहे की, तुमचं प्रेम, तुमची दिशा आणि तुमची दिशा हेच माझं राजकारण ठरवणार आहे – पंकजा मुंडे

  • 18/25

    मला भूमिका घ्यायची असेल तर पंकजा मुंडे अशीच सर्व माध्यमांना बोलावेल आणि समोर बसून बिनधास्त भूमिका जाहीर करेन – पंकजा मुंडे

  • 19/25

    कुणाच्या तरी खांद्यावर बंदूक ठेऊन बंदूक चालवण्याएवढे खांदे अजून तरी मला मिळाले नाहीत – पंकजा मुंडे

  • 20/25

    मात्र, माझ्या खांद्याची रुंदी इतकी आहे की, अनेक बंदुका माझ्या खांद्यावर विसावण्याचा प्रयत्न करत असतात – पंकजा मुंडे

  • 21/25

    त्या बंदुकांना मी माझ्या खांद्यावर विसावू देणार नाही – पंकजा मुंडे

  • 22/25
  • 23/25

    पंकजा मुंडेचं महात्म्य सांगितलं जातं, कमीपणा सांगितला जातो – पंकजा मुंडे

  • 24/25

    मी गोपीनाथ मुंडेंएवढी मोठी नाही म्हणतात. हो, बरोबर आहे. मला गोपीनाथ मुंडेंसारखं म्हणता तेही बरोबर आहे – पंकजा मुंडे

  • 25/25

    गोपीनाथ मुंढेंपेक्षा पुढे जाल असा आशीर्वाद देता तेही मी नम्रपणे स्वीकारते – पंकजा मुंडे (सर्व छायाचित्र – पंकजा मुंडे ट्विटर)

TOPICS
अमित शाहAmit Shahपंकजा मुंडेPankaja Mundeभारतीय जनता पार्टीBJP

Web Title: Pankaja munde say will meet amit shah and discuss with him pbs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.