• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. know about six election survey claim by congress about bjp defeat in madhya pradesh rss pbs

Photos : “RSS च्या सर्व्हेने भाजपात खळबळ”, काँग्रेसने दावा केलेले ६ निवडणूक कल कोणते? वाचा…

काँग्रेसने मध्य प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकींबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (आरएसएस) उल्लेख करत मोठा दावा केला आहे.

June 6, 2023 10:04 IST
Follow Us
  • काँग्रेसला कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे पक्षाचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे.
    1/21

    काँग्रेसला कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे पक्षाचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे.

  • 2/21

    या निकालानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जोरदार उत्साह पाहायला मिळत आहे.

  • 3/21

    अशातच काँग्रेसने मध्य प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकींबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (आरएसएस) उल्लेख करत मोठा दावा केला आहे.

  • 4/21

    “आरएसएसच्या सर्व्हेने भाजपात खळबळ, मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचं सरकार येत आहे”, असा मोठा दावा काँग्रेसने केला.

  • 5/21

    हा दावा करताना काँग्रेसने ६ सर्व्हेंचा हवाला दिला आहे. हे सर्व्हे नेमके कोणते आणि त्यातील दावे काय याचा हा आढावा…

  • 6/21

    १. जानेवारी २०२३ – सोशल मीडियावर संघाचा एक सर्व्हे मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. यात भाजपाला १०३ जागा मिळून सत्तेबाहेर जावं लागत आहे.

  • 7/21

    २. फेब्रुवारी २०२३ – काँग्रेसचा एक अधिकृत सर्व्हे समोर आला. यात भाजपाला केवळ ९५ जागा मिळत आहेत.

  • 8/21

    ३. मार्च २०२३ – गुप्तचर विभागाचा एक गुप्त सर्व्हे लिक झाला. त्यात भाजपाला ८० पेक्षा कमी जागा मिळताना दिसत आहे.

  • 9/21

    ४. एप्रिल २०२३ – दैनिक भास्कर आणि ईएमएससह इतर अनेक वृत्तसमुहांचे सर्व्हे प्रशासनात व्हायरल झाले आहेत. यात भाजपाला केवळ ७० जागा मिळत आहेत.

  • 10/21

    ५. मे २०२३ – ऑनलाइन डिजिटल प्लॅटफॉर्मवर एक सर्व्हे झाला त्यात भाजपाला केवळ ६५ जागा मिळताना दिसत आहे.

  • 11/21

    ६. जून २०२३ – नवभारत समाचारने एक सर्व्हे प्रकाशित केला. यात भाजपा सतेतेबाहेर जात असून केवळ ५५ जागा मिळत असल्याचं सांगण्यात आलं.

  • 12/21

    वरील सर्व सर्व्हेंमध्ये काँग्रेसच्या जागा वाढत असल्याचं आणि काँग्रेस जनतेचा आवाज म्हणून पुढे येत असल्याचं दिसत आहे – काँग्रेस

  • 13/21

    दुसरीकडे भाजपाची स्थिती वाईट होत आहे. यावरून हे स्पष्ट आहे की, यावेळी भाजपा ५० पेक्षा कमी जागांवर निवडून येईल – काँग्रेस

  • 14/21

    काँग्रेसने नेमकं काय म्हटलं? याचा आढावा खालीलप्रमाणे…

  • 15/21

    मध्य प्रदेशमध्ये यावर्षाच्या शेवटी विधानसभा निवडणूक होत आहे. या निवडणुकीआधी अनेक सर्व्हे समोर आले आहेत – काँग्रेस

  • 16/21

    यात मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचं सरकार येत असल्याचं दिसत आहे. भाजपाला केवळ ५५ जागांवर समाधान मानावं लागणार आहे – काँग्रेस

  • 17/21

    काँग्रेसकडे २०१८ च्या १५ महिन्यांचा कार्यकाळाचा अनुभव आणि कमलनाथ यांच्यासारखा निर्विवाद व अनुभवी नेता आहे. हे मुद्दे घेऊन काँग्रेस जनतेसमोर जात आहे – काँग्रेस

  • 18/21

    भाजपाची १८ वर्षांची देणेदारी आणि अपूर्ण घोषणांमुळे जनतेत सरकारविरोधी मोठी लाट तयार झाली आहे – काँग्रेस

  • 19/21

    मागील पाच महिन्यात मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीबाबत सहा वेगवेगळे सर्व्हे झाले आहेत. सर्व सर्व्हेंमध्ये भाजपाच्या जागा सातत्याने कमी होताना दिसत आहे – काँग्रेस

  • 20/21

    इतकंच नाही, तर सर्व सर्व्हेंमध्ये भाजपाचा दारूण पराभव होत असल्याचं समोर येत आहे – काँग्रेस

  • 21/21

    सर्व छायाचित्र – संग्रहित

TOPICS
काँग्रेसCongressभारतीय जनता पार्टीBJPमध्यप्रदेशMadhya Pradeshराष्ट्रीय स्वयंसेवक संघRashtriya Swayamsevak Sangh

Web Title: Know about six election survey claim by congress about bjp defeat in madhya pradesh rss pbs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.