-
महाविकास आघाडीचे सरकार कोसळण्याच्या मार्गावर होते. तेव्हा राष्ट्रवादीच्या ५४ पैकी ५१ आमदारांनी शरद पवारांना पत्र लिहित भाजपाबरोबर जाण्यासाठी इच्छा व्यक्त केली होती. पण, शरद पवार वेळेवर निर्णय घेण्यास अयशस्वी ठरले, असा गौप्यस्फोट खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे. प्रफुल्ल पटेल यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला मुलाखत दिली आहे.
-
प्रफुल्ल पटेल म्हणाले, “२०२२ च्या मध्यातच भाजपाबरोबर जाण्यासाठी हाचलाची सुरु झाल्या होत्या. मात्र, शरद पवार तातडीने निर्णय घेण्यास अपयशी ठरले.”
-
“यामुळे एकनाथ शिंदे यांनी संधी साधली आणि देवेंद्र फडणवीसांबरोबर जात सरकार स्थापन केलं.”
-
“आमदार, नेते नाहीच तर तळागळातील कार्यकर्तेही सरकारचा एक भाग बनले पाहिजेत. अनेक आमदारांना मतदारसंघातील निधीसाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. पण, राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आल्याने हे प्रश्न प्राधान्याने सोडवले जातील,” अशी अपेक्षा प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केली आहे.
-
“शिवसेनेबरोबर आमचे वैचारिक मतभेद होते. तरीही आमची सेनेबरोबर सरकार स्थापन केलं.”
-
“त्यामुळे राष्ट्रहित आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही भाजपाबरोबर हातमिळवणी केली. आणि सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला,” असेही प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलं.
PHOTOS : “२०२२ साली शरद पवार निर्णय घेण्यास अपयशी ठरले अन् एकनाथ शिंदेंनी…”, प्रफुल्ल पटेल यांचा सत्तास्थापनेबाबत गौप्यस्फोट
“आमदार, नेते नाहीच तर तळागळातील कार्यकर्तेही सरकारचा एक भाग बनले पाहिजेत,” असेही प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं.
Web Title: 51 mla speack sharad pawar last year ncp form govt with bjp say prafull patel ssa