-
उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते अजित पवार यांनी बंडखोरी केल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर भाजपाबरोबर अनेकदा युतीची चर्चा केल्याचा आरोप केला.
-
यावर आता शरद पवारांनी प्रत्युत्तर दिलं. ते शनिवारी (८ जुलै) नाशिकमध्ये बोलत होते. ते नेमकं काय म्हणाले याचा हा आढावा…
-
ते म्हणतात भाजपाबरोबर २०१४, २०१७, २०१९ मध्ये चर्चा झाली, पण निर्णय झाला होता का? – शरद पवार
-
राजकारणात चर्चा सगळी होते. अनेक गोष्टींवर चर्चा होते – शरद पवार
-
कधी डाव्या पक्षांबरोबर होते, कधी काही लोकांनी भाजपाचा प्रस्ताव दिल्यावर त्यावर चर्चा झाली – शरद पवार
-
पक्षात चर्चा होत राहिली पाहिजे – शरद पवार
-
चर्चेनंतर सामूहिक मत काय तयार होतं हे महत्त्वाचं असतं. त्यानुसार निर्णय राबवायचा असतो – शरद पवार
-
अनेकवेळा अनेकबाबतीत पक्षात चर्चा झाल्या आहेत – शरद पवार
-
चर्चा झाल्या याचा अर्थ निर्णय झालेला नाही. त्यामुळे जो निर्णय अंतिम आहे तोच खरा – शरद पवार
-
अजित पवारांना जितेंद्र आव्हाडांनी पक्षाचं नुकसान केलं असं वाटत असेल, तर ठीक आहे – शरद पवार
-
मात्र, जितेंद्र आव्हाडांनी कधीही भाजपात जायचं अशी भूमिका घेतली नाही – शरद पवार
-
ज्यांनी भाजपाबरोबर जाण्याची भूमिका घेतली, त्याने पक्षाचं नुकसान झालं की, जे पक्षाशी प्रामाणिकपणे राहतात, संघर्ष करतात त्यांनी नुकसान केलं याचा विचार करायला हवा – शरद पवार
“भाजपाबरोबर २०१४, २०१७, २०१९ मध्ये चर्चा झाली, पण…”, पहिल्यांदाच शरद पवारांची कबुली, म्हणाले…
शरद पवारांनी अजित पवार गटाला प्रत्युत्तर दिलं. ते शनिवारी (८ जुलै) नाशिकमध्ये बोलत होते. ते नेमकं काय म्हणाले याचा हा आढावा…
Web Title: Sharad pawar important statements on ajit pawar faction allegations pbs