-
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यात भेट झाली.
-
या भेटीवेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही उपस्थित होते. या बैठकीच्या दुसऱ्याच दिवशी जयंत पाटील यांच्या बंधुंना ईडीची नोटीस आली. त्यामुळे जयंत पाटीलही भाजपाबरोबर जाणार असल्याच्या चर्चां रंगल्या आहेत.
-
जयंत पाटील भाजपाबरोबर जाणार असल्याच्या चर्चांवर शरद पवार यांना आज ( सोमवार, १४ ऑगस्ट ) बारामतीत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर, सत्तेचा गैरवापर करून ही पावले टाकली जात असल्याचा आरोप शरद पवारांनी केला आहे.
-
शरद पवार म्हणाले, “जयंत पाटलांच्या बंधूंना ईडीची नोटीस आल्याची माहिती माझ्या कानावर आली आहे.”
-
“सत्तेचा गैरवापर करून ही पावले टाकली जात आहे. आमच्या काही सहकाऱ्यांना अशा काही नोटीसा आल्यानंतर ते भाजपाबरोबर जाऊन बसले.”
-
“तसेच, आता जयंत पाटलांबाबत करण्याची भूमिका घेण्यात आल्याचं दिसत आहे. पण, जयंत पाटील यांची भूमिका स्पष्ट आहे,” असं शरद पवारांनी सांगितलं.
जयंत पाटील भाजपाबरोबर जाणार? ईडीचा उल्लेख करत शरद पवार म्हणाले….
“आमच्या काही सहकाऱ्यांना अशा काही नोटीसा आल्यानंतर ते…”, असे शरद पवारांनी म्हटलं.
Web Title: Sharad pawar on jayant patil bjp join and ed notice ssa