-
देशात २०२४ साली लोकसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. यासाठी भाजपाकडून तयारी करण्यात येत आहे.
-
तर, केंद्रातील भाजपा सरकारचा पराभव करण्यासाठी विरोधक ‘इंडिया’ आघाडीच्या नेतृत्वाखाली एकत्र आले आहेत.
-
पण, २०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदासाठी जनतेची कोणला पसंती आहे? याचा एक सर्व्हे समोर आला आहे. ‘एबीपी’ आणि ‘सी व्होटर्स’ने छत्तीसगढमधील ११ लोकसभा आणि ९० विधानसभा क्षेत्रांचा सर्व्हे केला आहे. त्यामध्ये १८ वर्षांवरील ७६७९ जणांनी सर्व्हेत भाग घेतला होता.
-
२०२४ साली होणाऱ्या निवडणुकीत पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींना जनतेनं सर्वाधिक पसंती दिली आहे.
-
तर, दुसऱ्या क्रमाकांवर राहुल गांधींना जनतेनं पसंती दिली आहे.
-
सर्व्हेमध्ये ६२ टक्के लोकांनी नरेंद्र मोदी पंतप्रधानपदासाठी पसंती दर्शवली आहे.
-
तर, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना केवळ ३ टक्के लोकांनीच पसंती दिली आहे.
-
मोदी यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेसचे माजी अध्यक्ष, खासदार राहुल गांधी आहेत. त्यांना २० टक्के लोकांनी पंतप्रधानपदासाठी पसंती दाखवली आहे.
-
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ६ टक्के, तर अन्य नेत्यांना ९ टक्के लोकांनी पसंती दिली आहे.
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, केजरीवाल की योगी आदित्यनाथ, पंतप्रधानपदासाठी जनतेची कोणाला पसंती? वाचा सर्व्हे…
११ लोकसभा आणि ९० विधानसभे क्षेत्रात हा सर्व्हे करण्यात आला आहे.
Web Title: Loksabha election 2024 narendra modi rahul gandhi yogi adityanath arvind kejriwal who pm first choise people ssa