• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पावसाळी अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. manoj jarange get angry after allegations over a paper note by raosaheb danve pbs

रावसाहेब दानवेंनी रात्री खिशातून काढलेल्या ‘त्या’ चिट्ठीने चर्चांना उधाण, मनोज जरांगे संतापले, म्हणाले…

१७ व्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते फळांचे रस घेत उपोषण सोडल्यावर मनोज जरांगे नेमके काय म्हणाले याचा हा आढावा…

Updated: September 15, 2023 10:32 IST
Follow Us
  • मराठा आरक्षणासाठी मागणीसाठी बेमुदत उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांनी गुरुवारी (१४ सप्टेंबर) १७ व्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते फळांचे रस घेत उपोषण सोडलं.
    1/27

    मराठा आरक्षणासाठी मागणीसाठी बेमुदत उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांनी गुरुवारी (१४ सप्टेंबर) १७ व्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते फळांचे रस घेत उपोषण सोडलं.

  • 2/27

    यानंतर बोलताना मनोज जरांगे यांनी मोठी विधानं केली. ते नेमके काय म्हणाले याचा हा आढावा…

  • 3/27

    लईच अवघड खेळ आहे. रावसाहेब दानवेंनी रात्री एक चिट्ठी काढली. यानंतर पत्रकारांनी ती कशाची चिट्ठी आहे, कशाची चिट्ठी आहे असं विचारून मला बेजार करून टाकलं – मनोज जरांगे

  • 4/27

    हे मला रात्रीची झोपही येऊ देईना. रात्री रग ओढायला लागले. कोण नेता होता असं विचारलं जात होतं. मात्र, मी सांगून टाकतो की, मी तसले धंदेच करत नाही – मनोज जरांगे

  • 5/27

    मी खानदानी घरात जन्माला आलो आहे. मी खानदानी मराठा आहे – मनोज जरांगे

  • 6/27

    मी कुणाच्या सांगण्यावरून आंदोलन करत नाही. मी तशी औलाद नाही, माझं तसलं रक्त नाही – मनोज जरांगे

  • 7/27

    त्या चिट्ठीत स्पष्टपणे आमच्या मागण्यांवर चर्चा केलेली होती – मनोज जरांगे

  • 8/27

    रावसाहेब दानवे आणि गिरीश महाजन यांनी मला ती चर्चा अशी आहे असं सांगत ती चिट्ठी दिली. मी माझ्या मराठा समाजासमोर पारदर्शक आहे – मनोज जरांगे

  • 9/27

    माझं वाटोळं झालं, राखरांगोळी झाली, तरी मराठा समाजाशी कधीच गद्दारी करणार नाही – मनोज जरांगे

  • 10/27

    तो कोण आहे त्याने लक्षात ठेवावं की, मी मराठा समाजाशी गद्दारी करणार नाही, पण तो जर उघडा झाला, तर राज्यात त्याचा एकही पदाधिकारी राहणार नाही – मनोज जरांगे

  • 11/27

    त्यांनी मराठा समाजाच्या पोरांशी घात करू नये – मनोज जरांगे

  • 12/27

    आमच्या तोंडात आरक्षणाचा घास आला आहे. त्यांनी त्यांची वायफळ बडबड करू नये – मनोज जरांगे

  • 13/27

    आमच्या मराठ्यांच्या पाच पिढींमधील लेकरांचं वाटोळं झालं आहे. त्यांनी त्यांच्या राजकारणासाठी माझा घात करू नये – मनोज जरांगे

  • 14/27

    आम्ही तसले धंदे करत नाही. जे असेल ते पारदर्शकपणे समाजाच्या समोर काम करतो – मनोज जरांगे

  • 15/27

    आत्ताही सांगतो की, आम्ही सरकारला दिलेल्या वेळेवर ठाम आहोत. आम्ही मोठ्या मनाने १० दिवसांचा वेळ वाढवून दिला आहे – मनोज जरांगे

  • 16/27

    आम्हाला इतर कशाचीही गरज नाही,आम्हाला आरक्षण द्या – मनोज जरांगे

  • 17/27

    आम्ही असे चिट्ठीफिट्ठीचे धंदे करत नाही – मनोज जरांगे

  • 18/27

    मी उभ्या आयुष्याची राखरांगोळी केली – मनोज जरांगे

  • 19/27

    मला माझ्या रानाचा बांध कुठंही हेही माहिती नाही – मनोज जरांगे

  • 20/27

    मी इतकं रात्रंदिवस समाजासाठी काम करतो – मनोज जरांगे

  • 21/27

    योगायोगाने माझा बाप इथं आला आहे. मी माझं मोठेपण सांगत नाही, माझा बाप कष्ट करतो आणि आम्हाला खाऊ घालतो – मनोज जरांगे

  • 22/27

    बापाच्या कष्टाचं खाऊन हा पठ्ठ्या समाजाचं काम करतो – मनोज जरांगे

  • 23/27

    एकाने जरी मला म्हटलं की, तुला फिरायला एक रुपया दिला आहे, तर त्या दिवशी मी आत्महत्या करेन – मनोज जरांगे

  • 24/27

    हे असले चिट्ठीफिट्ठीचे कारण आम्हाला सांगायचे नाही – मनोज जरांगे

  • 25/27

    ते आम्हाला सहन होणार नाही – मनोज जरांगे

  • 26/27

    जे बेगडी लोकं असतात त्यांना हे सहन होईल, मी सहन करू शकत नाही. कारण माझं उभं खानदान कष्टात गेलं आहे – मनोज जरांगे

  • 27/27

    सर्व छायाचित्रे – संग्रहित/सोशल मीडिया

TOPICS
एकनाथ शिंदेEknath Shindeमनोज जरांगे पाटीलManoj Jarange Patilमराठा आरक्षणMaratha Reservation

Web Title: Manoj jarange get angry after allegations over a paper note by raosaheb danve pbs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.