• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • दिवाळी २०२५
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ-बिहार निवडणूक
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. eknath shinde reply uddhav thackeray over shivsena mumbra shivsena shakha allegations ssa

“सत्तेचा माज आलेल्यांनी शिवसेनेची शाखा पाडली”, ठाकरेंच्या विधानाला प्रत्युत्तर देत मुख्यमंत्री म्हणाले…

“…म्हणून काहींना पोटदुखी उठली”, अशी टीकाही मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंवर केली आहे.

November 12, 2023 17:51 IST
Follow Us
  • Eknath Shinde criticize Uddhav Thackeray
    1/6

    सत्तेचा माज आलेल्यांनी बुलडोझरने शिवसेनेची शाखा पाडली. पण, खरा बुलडोझर घेऊन मुंब्र्यातील रस्त्यावर आलो आहे. आमचे बॅनर फाडल्याचे कळले. पण, निवडणुका येऊद्या तुमची मस्ती फाडतो, असा इशारा शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला दिला होता.

  • 2/6

    याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत जनतेनं त्यांना धडा शिकवला आहे. महायुतीचं सरकार १ नंबरला आहे.”

  • 3/6

    “आम्हाला धडा शिकवण्याचा भाषा करणारे मागील निवडणुकीत ५ नंबरला होते. आता ७ नंबरला आहेत. येणाऱ्या निवडणुकीत १० नंबरला जातील,” असा टोला मुख्यमंत्र्यांनी ठाकरे गटाला लगावला.

  • 4/6

    “मुंब्र्यात फुसके बार येऊन गेले, पण वाजलेच नाहीत. कारण, आमच्या कार्यकर्त्यांनी एवढे फटाके वाजवले की काहींना युटर्न घेऊन परत जावं लागलं,” असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं.

  • 5/6

    “बाळासाहेबांचं प्रेम ठाणे जिल्ह्यावर होतं. ठाणे जिल्हा हा धर्मवीर आनंद दिघे यांचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे येथील नागरिक काम करणारे आणि घरी बसणारे बरोबर ओळखतात,” असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.

  • 6/6

    “आमच्या कार्यकर्त्यांनी अतिशय शिस्तीचं दर्शन घडवलं. दिवाळीच्या सणामध्ये विघ्न आणणं कुठल्याही राजकीय नेत्याला शोभत नाही. पण, ज्यांनी सत्तेत असताना कायम सण-उत्सवांवर बंदी घातली. आम्ही आल्यावर सर्व सण उत्सवांवर बंदी उठवली. त्यामुळे काहींना पोटदुखी उठली,” अशी टीकाही मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.

TOPICS
उद्धव ठाकरेUddhav Thackerayएकनाथ शिंदेEknath ShindeठाणेThaneशिवसेनाShiv Sena

Web Title: Eknath shinde reply uddhav thackeray over shivsena mumbra shivsena shakha allegations ssa

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.