• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. raja bhaiya net worth gold guns acquaitted allahabad high court jshd import pmw

उत्तर प्रदेशचे ‘राजा भैय्या’; आमदार म्हणून नव्हे, तर गडगंज संपत्तीसाठी आहेत चर्चेत! घरात ६ बंदुका आणि…

उत्तर प्रदेशमधील ‘बाहुबली’ आमदार राजा भैय्या यांची नुकतीच अलाहाबाद उच्च न्यायालयाने १४ वर्षं जुन्या अपहरण व गोळीबार प्रकरणातून सुटका केली. त्यामुळे सध्या ते चर्चेचा विषय ठरले आहेत!

March 5, 2024 13:17 IST
Follow Us
  • raghuraj pratap singh raja bhaiya net worth
    1/9

    उत्तर प्रदेशच्या राज्यसभा निवडणुकांमुळे घोडेबाजाराची तुफान चर्चा झाली असली, तरी त्याहून जास्त चर्चा या निवडणुकीत किंग मेकर ठरलेल्या ‘राजा भैय्या’ उर्फ आमदार रघुराज प्रताप सिंह यांची होती. ऐनवेळी त्यांनी भाजपाच्या उमेदवाराला मत देण्याची घोषणा करून खळबळ उडवून दिली होती.

  • 2/9

    लोकशाही जनसत्ता पक्षाचे अध्यक्ष आमदार राजा भैय्या यांनी २०२२ च्या निवडणुकीत जाहीर केलेल्या आकड्यांनुसार त्यांच्याकडे एकूण २३ कोटी ६९ लाख ७१ हजार ३८ रुपये मूल्याची संपत्ती आहे!

  • 3/9

    राजा भय्या, त्यांच्या पत्नी भानवी कुमारी सिंह आणि त्यांच्या मुलांच्या नावे वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये ८ कोटी २२ लाख २८ हजार १५८ रुपये जमा आहेत!

  • 4/9

    राजा भय्या यांच्याकडे एकूण १६ कोटींची संपत्ती व ७ कोटींची स्थावर मालमत्ता आहे.

  • 5/9

    उत्तर प्रदेशच्या कुंडा विधानसभा मतदारसंघातून राजा भैय्या आमदारकीची निवडणूक जिंकले आहेत. त्यांच्याकडे जवळपास ६ कोटींचे दागिने आहेत.

  • 6/9

    राजा भैय्या शस्त्रांचेही शौकीन आहेत. दोघा पती-पत्नीकडे पिस्तुल, रायफल आणि बंदूक आहे. या शस्त्रांची किंमतही जवळपास ४ ला ३० हजारांच्या घरात आहे.

  • 7/9

    राजा भैय्यांकडे ४० लाख रुपयांची टोयोटा रेंज रोव्हर कार आहे. त्यांच्याकडे एक लँड क्रूजर कारही असल्याचं सांगितलं जात असून त्याची किंमत १ कोटींच्या घरात आहे!

  • 8/9

    त्यांचा मतदारसंघ असणाऱ्या कुंडामध्ये राजा भैय्या यांच्या मालकीची २.४ कोटी रुपयांची शेतजमीन आहे. याशिवाय ३.४ कोटी रुपयांचा आणखी एक भूखंडही त्यांच्यानावे आहे.

  • 9/9

    याव्यतिरिक्त राजा भैय्या यांच्याकडे प्रतापगड, प्रयागराज आणि दिल्लीत प्रत्येकी एक घर आहे. या घरांच्या किंमतीही प्रत्येकी २ कोटींच्या घरात असल्याचं सांगितलं जातं.

TOPICS
नॅशनल न्यूजNational Newsभारतीय जनता पार्टीBJPमराठी बातम्याMarathi Newsलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Election

Web Title: Raja bhaiya net worth gold guns acquaitted allahabad high court jshd import pmw

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.