• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. wherever pm narendra modi visited they highlighted spiritual places for tourism kvg

पंतप्रधान मोदींकडून आध्यात्मिक पर्यटनाला चालना; द्वारका, केदारनाथ, आता शंकराचार्य मंदिर

पर्यटनातून स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्होकल फॉर लोकल कार्यक्रम सुरू केला. आता भारतातील विविध राज्यांचा दौरा करताना ते आध्यात्मिक स्थळांना भेटी देत आहेत. जेणेकरून याठिकाणच्या पर्यटनाला चालना मिळेल. (सर्व फोटो – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एक्स अकाऊंट)

March 7, 2024 14:48 IST
Follow Us

  • Shankaracharya Hill from a distance _ 1
    1/9

    जम्मू आणि काश्मीरमधून कलम ३७० हटविल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज पहिलाच दौरा संपन्न झाला.

  • 2/9

    श्रीनगरच्या बक्षी स्टेडियमवर झालेल्या जाहीर सभेत त्यानी ६,४०० कोटींच्या विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन केले. यावेळी त्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये मागच्या पाच वर्षांत झालेल्या बदलांचा आढावा घेतला.

  • 3/9

    कलम ३७० हटविल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये विकासाची गंगा कशी पोहोचली? याची माहिती त्यांनी दिली. तसेच शंकराचार्य मंदिराचे दुरून दर्शन घेत. त्याचे फोटो त्यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर पोस्ट केले.

  • 4/9

    जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटन वाढीस लागले असून त्याला आणखी चालना देण्याचेही आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले. मागच्या काही काळापासून पंतप्रधान मोदी आध्यात्मिक पर्यटनाला चालना देत आहेत.

  • 5/9

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी गुजरातमधील द्वारका, राजकोटला भेट दिली. दरम्यान, त्यांनी द्वारका येथील द्वारका बेटाला जोडणाऱ्या सुदर्शन सेतूचे उद्घाटन केले. द्वारकाधीश मंदिरात पूजा केली आणि द्वारकेच्या समुद्रात स्कुबा ड्रायव्हिंगचा थरार अनुभवला.

  • 6/9

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही द्वारकेच्या समुद्रात स्कुबा ड्रायव्हिंगचा आनंद लुटल्यानंतर हा अलौकिक आध्यात्मिक अनुभव होता, अशी प्रतिक्रिया दिली होती. स्कुबा ड्रायव्हिंग करत असताना त्यांना द्वारका या ऐतिहासिक शहराचे अवशेष दिसले, जे द्वारकेच्या समुद्रात वर्षांपूर्वी बुडाले होते.

  • 7/9

    द्वारकेच्या समुद्रात स्कूबा ड्रायव्हिंगचा रोमांचकारी अनुभव पंतप्रधान मोदींनी व्हिडिओद्वारेदेखील शेअर केला आहे. यानिमित्ताने त्यांनी द्वारका येथे स्कुबा ड्रायव्हिंग पर्यटनाला चालना दिली.

  • 8/9

    काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदी यांनी बाबा केदारनाथ मंदिरालाही भेट दिली होती. तसेच २०१९ च्या लोकसभा निकालाआधी त्यांनी केदारनाथ गुहेत एक दिवसांचे ध्यान केले होते.

  • 9/9

    आध्यात्मिक ठिकाणांबरोबरच पंतप्रधान मोदींनी काही दिवसांपूर्वी लक्षद्विप बेटाचा दौरा केला. या दौऱ्यामुळे मालदिवने जळफळाट व्यक्त केला होता. ज्यामुळे अनेक सेलिब्रिटींनी यापुढे लक्षद्विपच्या पर्यटनाला प्राथमिकता देऊ अशा आशयाच्या पोस्ट टाकल्या गेल्या. एका दौऱ्यामुळे मोदींनी लक्षद्विपच्या पर्यटनाला चालना दिली.

TOPICS
आध्यात्मिकSpiritualजम्मू आणि काश्मीरJammu And Kashmirपंतप्रधान नरेंद्र मोदीPM Narendra Modiपर्यटनTourismपर्यटन विशेषParyatan Vishesh

Web Title: Wherever pm narendra modi visited they highlighted spiritual places for tourism kvg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.