-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १२ मार्च २०२४ रोजी अहमदाबादमध्ये देशातील १ लाख ६ हजार कोटी रूपयांच्या विकासकामांची ऑनलाईन पायाभरणी, उद्घाटने केली. यामध्ये विविध क्षेत्रांचा समावेश आहे.
-
या पायाभरणी कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव उपस्थित होते.
-
याच पायाभरणी कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० नवीन वंदे भारत रेल्वेंना हिरवा झेंडा दाखवला.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘रांची-वाराणसी’ वंदे भारत रेल्वेला अहमदाबाद येथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा झेंडा दाखवला. त्यावेळी रांची रेल्वे स्टेशनवर उपस्थित भाजपा खासदार संजय सेठ यांनी आनंद व्यक्त केला.
-
साबरमती आश्रम प्रकल्पाच्या मास्टर प्लॅनच्या शुभारंभाच्या आधी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साबरमती आश्रमातील Visitor Book मध्ये स्वतःचे नाव नोंद केल्याचे पाहायला मिळाले.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘रांची-वाराणसी’ वंदे भारत रेल्वेला गुजरातच्या अहमदाबाद येथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा झेंडा दाखवला तेथील क्षण.
-
या कार्यक्रमात लोकांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “देशातील युवक ठरवतील त्यांना कसा देश हवा आहे आणि कोणत्या प्रकारची रेल्वे हवी आहे. इच्छाशक्ती असेल तर सर्वकाही शक्य आहे, ये १० साल का काम अभी तो ट्रेलर है, मुझे तो और आगे जाना है”
-
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, “त्यांच्या सरकारने भारतीय रेल्वेला वाईट परिस्थितीतून बाहेर काढण्याची इच्छाशक्ती दाखवली. आता, भारतीय रेल्वेचा विकास हा भारत सरकारच्या केंद्रस्थानी आहे.”
-
भाजपाकडून आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात भारतीय रेल्वेच्या विकासाचा मुद्दा वापरला जाण्याची शक्यता आहे. (सर्व फोटो सौजन्य- पीटीआय)
“ये १० साल का काम अभी तो ट्रेलर है, मुझे तो..”; काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
या कार्यक्रमात लोकांना संबोधित करताना मोदी म्हणाले, “देशातील युवक ठरवतील त्यांना कसा देश हवा आहे आणि कोणत्या प्रकारची रेल्वे हवी आहे”.
Web Title: Pm modi propels indian railways growth at ahemadabad multiple developmental projects foundation stone spl