• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. mumbai heavy rains dust storm hoarding collapse deaths now crime branch investigate the case spl

भावेश भिंडेच्या नावे बलात्काराचाही गुन्हा; घाटकोपर दुर्घटनेचा तपास आता क्राईम ब्रांचकडे

गुन्हे शाखेने या प्रकरणातील मुख्य आरोपी भावेश प्रभूदास भिंडे (५१) याला उदयपूर येथून अटक केली होती. आता या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा करणार आहे.

Updated: May 17, 2024 15:42 IST
Follow Us
  • Mumbai rain
    1/9

    घाटकोपर दुर्घटना प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे (क्राईम ब्रांच) वर्ग करण्यात आला आहे. (एक्स्प्रेस फोटो- दीपक जोशी)

  • 2/9

    गुन्हे शाखेने या प्रकरणातील मुख्य आरोपी भावेश प्रभूदास भिंडे (५१) याला उदयपूर येथून अटक केली होती. (एक्स्प्रेस फोटो- दीपक जोशी)

  • 3/9

    आता या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा करणार आहे.(एक्स्प्रेस फोटो- गणेश शिर्सेकर)

  • 4/9

    मुसळधार पावसाने सोमवारी १३ मे रोजी मुंबईला झोडपून काढले होते आणि त्याच पावसात होर्डिंग कोसळल्याची घटना घडली होती. (एक्स्प्रेस फोटो- अमित चक्रवर्ती)

  • 5/9

    घाटकोपरमधील महाकाय जाहिरात फलक कोसळल्यानंतर भिंडेने अटकेच्या भीतीने पळ काढला होता. (एक्स्प्रेस फोटो- अमित चक्रवर्ती)

  • 6/9

    मुंबई पोलिसांचे पथक त्याच्या मुलुंड येथील घरी पोहोचले. पण तो पसार झाला होता. पोलिसांना त्याचे शेवटचे ठिकाण लोणावळा असल्याचे समजले होते. त्यानंतर पोलिसांचे पथक तेथे पाठवण्यात आले. मात्र तो घटनास्थळी सापडला नाही. त्याचा मोबाइल बंद होता. (एक्स्प्रेस फोटो- गणेश शिर्सेकर)

  • 7/9

    त्यानंतर त्याचा थांगपत्ता लागत नव्हता. लोणावळा येथून तो राजस्थानमध्ये पळाला होता. अखेर भिंडेला उदयपूर येथील रिसॉर्टमधून अटक करण्यात आली. आता त्याच्याविरोधातील हे प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले आहे. (Photo- ANI)

  • 8/9

    इगो मीडिया कंपनीचा संचालक भिंडे याच्यावर यापूर्वी २४ जानेवारी रोजी मुलुंड पोलीस ठाण्यात बलात्कार आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुलुंडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय जोशी यांना याबाबत विचारले असता त्यांनी भिंडेवर बलात्काराचा गुन्हा दाखल असल्याचे सांगितले. याप्रकरणी मुलुंड पोलिसांनी यापूर्वीच आरोपपत्र दाखल केले असून मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. भिंडेने २००९ मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. त्यावेळी महापालिकेच्या परवानगीशिवाय फलक लावल्याप्रकरणी त्याच्यावर २१ वेळा कारवाई करण्यात आली होती. याशिवाय दोन वेळा निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स कायद्याअंतर्गत त्याच्याविरोधात खटले दाखल झाले होते. धनादेश न वठल्याप्रकरणी निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स कायद्याअंतर्गत खटला चालविण्यात येतो. (संग्रहित छायाचित्र/इंडियन एक्स्प्रेस)

  • 9/9

    घाटकोपर दुर्घटनेप्रकरणीपंतनगर पोलिसांनी सोमवारी रात्री जाहिरात फलक पडून अनेकांचा मृत्यू झाल्याप्रकरणी भिंडेविरोधात भादंवि कलम ३०४ (सदोष मनुष्यवध), ३३८ (गंभीर दुखापत), ३३७ (निष्काळजी कृत्यामुळे दुखापत करणे) व ३४ (सामान्य हेतू) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. आता त्याचा तपास गुन्हे शाखा करणार आहे. (Photo- ANI)

TOPICS
क्राईम न्यूजCrime Newsमराठी बातम्याMarathi NewsमुंबईMumbai

Web Title: Mumbai heavy rains dust storm hoarding collapse deaths now crime branch investigate the case spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.