• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. ashish shelar latest statement on uddav thakre about election results and leave politics spl

PHOTOS : “आधी उद्धव ठाकरेंना…”, राजकीय सन्यास घेण्याच्या वक्तव्यावर आशिष शेलारांचं नवं स्पष्टीकरण

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता नेत्यांनी प्रचारात केलेल्या टीकाटिप्पण्यावरून परत एकदा एकमेकांना घेरण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

Updated: June 6, 2024 16:56 IST
Follow Us
  • ashish shelar inspected the mumbai drain cleaning work
    1/9

    देशामध्ये लोकसभा निवडणुकीच्या निकालांना जाहीर होऊन दोन दिवस झाले आहेत.

  • 2/9

    दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये एकमेकांवर जोरदार टीका करताना सर्वच नेते आपल्याला दिसत होते. इंडिया आघाडी आणि एनडीए आघाडी या दोघांमध्ये परस्पर लढाई लोकसभा २०२४ च्या निवडणुकीत झालेली आपण पाहिली.

  • 3/9

    दरम्यान निकालांमध्येही त्याचा परिणाम आपल्याला दिसून आला प्रचंड प्रमाणावर चुरशीची लढत होऊन निकालही त्याप्रमाणेच आले आहेत. राज्यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी असा संघर्ष झाला.

  • 4/9

    महायुतीच्या नेत्यांकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार टीका झाल्या तर महाविकास आघाडीनेही जशास तसे उत्तर देत त्या टीकांचा सामना केला.

  • 5/9

    दरम्यान मुंबईचे भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एक वक्तव्य केलं होतं, ते म्हणाले होते “लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला जर १८ जागा मिळाल्या तर मी संन्यास घेईल.” त्यांच्या या वक्तव्यावर निकाल जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आणि कार्यकर्त्यांकडून जोरदार टीका होत आहे. त्यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली जात आहे.

  • 6/9

    त्यावर आशिष शेलार यांनी आता स्पष्टीकरण दिलं आहे. आशिष शेलार यांनी त्यांच्याच वक्तव्यावर आता घुमजाव केला आहे. ते म्हणाले “उद्धव ठाकरेही म्हणाले होते की देशामध्ये एनडीए ४०० जागा काय ४० जागाही जिंकणार नाही. आता भाजपाला ४० जागा पेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत त्यामुळे उद्धव ठाकरे आता तोंड का लपवत आहेत. त्यामुळे आता उद्धव ठाकरे सन्यास घेतील का? ” असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी त्यांच्या वक्तव्यावर घुमजाव केला आहे.

  • 7/9

    महाविकास आघाडीने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसने १३, शिवसेना ९ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने ८ जागांवर मिळविला आहे. महाविकास आघाडीने जिंकलेल्या जागांची बेरीज ३० होते, तर सांगलीचे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी काँग्रेसा पाठिंबा दिल्यास मविआची संख्या ३१ होऊ शकते.

  • 8/9

    दुसरीकडे महायुतीच्या जागा घटल्या आहेत. भाजपाला केवळ ९ जागांवर समाधान मानावे लागले आहे. तर शिवसेना शिंदे गट ७ आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला केवळ एका जागेवर विजय मिळविता आला. महायुतीची बेरीज १७ होते.

  • 9/9

    हेही पहा- ओडिशा: २४ व्या वर्षी IAS, २०१८ मध्ये राजकारणात प्रवेश, आता थेट मुख्यमंत्रीपदाच्या शर्…

TOPICS
आशिष शेलारAshish Shelarउद्धव ठाकरेUddhav Thackerayभारतीय जनता पार्टीBJPमराठी बातम्याMarathi Newsलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Election

Web Title: Ashish shelar latest statement on uddav thakre about election results and leave politics spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.