• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. nda government formation narendra modi meets bjp veterans lk advani murli manohar joshi kvg

Photo : आघाडीचं सरकार चालविण्याआधी मोदींनी घेतला जोशी-अडवाणींचा आशीर्वाद

PM Modi meets LK Advani : एनडीएच्या बैठकीत नरेंद्र मोदी यांना संसदीय मंडळाचा नेता घोषित केल्यानंतर त्यांनी भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांची भेट घेतली. (सर्व फोटो ANI / Narendra Modi एक्स अकाऊंट)

June 7, 2024 20:06 IST
Follow Us
  • NDA meeting _ 10
    1/11

    लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आज पहिल्यांदाच एनडीएच्या घटकपक्षांची आणि खासदारांची बैठक संसदेतील सेंट्रल हॉलमध्ये संपन्न झाली. या बैठकीत नरेंद्र मोदी यांना एनडीए संसदीय मंडळाचे नेते म्हणून घोषित करण्यात आले.

  • 2/11

    या बैठकीनंतर नरेंद्र मोदी यांनी भाजपाचे ज्येष्ठ नेते, सल्लागार मंडळातील नेते, माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.

  • 3/11

    गेल्या अनेक वर्षांपासून अडगळीत पडलेल्या या दोन्ही नेत्यांची नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा भेट घेतली. २०१९ पासून हे दोन्ही नेते भाजपाच्या कुठल्याही मंचावर आलेले नाहीत.

  • 4/11

    काही महिन्यांपूर्वीच लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांची भेट घेतली होती.

  • 5/11

    दोन टर्म पूर्ण बहुमताचे सरकार चालविल्यानंतर यावेळी नरेंद्र मोदी यांना एनडीएचा पाठिंबा असलेले आघाडी सरकार चालवावे लागणार आहे. त्यासाठी आघाडीतील प्रत्येक नेत्याचा सन्मान ठेवण्याचा प्रयत्न आजच्या बैठकीतून झाला.

  • 6/11

    आघाडीचे सरकार असल्यामुळे तेलगू देसम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष एन. चंद्राबाबू नायडू, जनता दल युनायटेडचे नितीश कुमार, शिवसेना शिंदे गटाचे नेते एकनाथ शिंदे आणि इतर नेत्यांना आता महत्त्व प्राप्त झाले आहे.

  • 7/11

    आज झालेल्या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी ४८ मिनिटांच्या भाषणात जवळपास ३९ वेळा एनडीए/ गठबंधन/ युती या शब्दांचा प्रयोग केला. यातूनच आता त्यांना एनडीएची किती निकड वाटते, हे ध्यानात येते.

  • 8/11

    लोकसभा निवडणुकीत यंदा जनतेने भाजपाच्या पारड्यात बहुमत टाकले नाही. भाजपा पक्ष २४० वर मर्यादीत राहिला. बहुमतासाठी त्यांना आणखी ३२ खासदारांचा पाठिंबा लागणार आहे.

  • 9/11

    आजच्या बैठकीत एनडीएबद्दल भरभरून बोलत असताना आपल्या मित्रपक्षांच्या नेत्यांचेही मोदींनी कौतुक केले. चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार हे आपापल्या राज्यात कसे सुसाशन राबवत आहेत, याचा उल्लेख केला.

  • 10/11

    तसेच त्यांनी काँग्रेसवरही जोरदार टीका केली. आमच्या जेवढ्या जागा या निवडणुकीत निवडून आल्या आहेत, तेवढ्या तर काँग्रेसच्या तीनही निवडणुकांची बेरीच केली तरी होत नाहीत. निकालानंतर भाजपाचा पराभव झाल्याचे चित्र निर्माण करण्यात आले, पण त्यात तथ्य नाही, असेही ते म्हणाले.

  • 11/11

    नरेंद्र मोदी आता ९ जून रोजी सायंकाळी ६ वाजता राष्ट्रपती भवनात पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. यावेळी त्यांच्याबरोबर किती मंत्री शपथ घेतात, याची माहिती कळू शकलेली नाही.

TOPICS
एनडीएNDAनरेंद्र मोदीNarendra Modiमुरलीमनोहर जोशीलालकृष्ण अडवाणीLK Aadvaniलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Election

Web Title: Nda government formation narendra modi meets bjp veterans lk advani murli manohar joshi kvg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.