• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. which countries celebrate independence day on august 15 besides india kvg

Photo: १५ ऑगस्टला भारताव्यतिरिक्त आणखी कोणकोणत्या देशात स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो?

15 August Independence Day : भारतासह जगातील आणखी काही देश १५ ऑगस्ट रोजी त्यांचा स्वातंत्र्य दिन साजरा करतात. हे देश कोणते आहेत? ते पाहू.

August 12, 2024 18:05 IST
Follow Us
  • Indian independence day Celebration
    1/9

    यंदा १५ ऑगस्ट रोजी आपण भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहोत. भारताला जसे ब्रिटिशांपासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले. तसेच जगात इतर देशांनाही याच दिवशी निरनिराळ्या वर्षी स्वातंत्र्य मिळालेले आहे. (Express Photo by Gurmeet Singh)

  • 2/9

    दक्षिण कोरियामध्ये १५ ऑगस्टला Gwangbokjeol म्हणजेच राष्ट्रीय स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. दक्षिण कोरियात (South Korea) या दिवसाला प्रकाशमय दिवसाचा जीर्णोद्धार असेही म्हटले जाते. १९४५ साली दक्षिण कोरियाला जपानकडून स्वातंत्र्य मिळाले. (Photo – REUTERS/Kim Hong-Ji/Pool)

  • 3/9

    दक्षिण कोरियाप्रमाणेच उत्तर कोरियाही (North Korea) याच दिवशी आपला स्वातंत्र्य दिन साजरा करतो. दुसऱ्या महायुद्धानंतर १५ ऑगस्ट १९४५ रोजी दोन्ही देशांमधील जपानची राजवट संपुष्टात आली. (Photo – KCNA via REUTERS)

  • 4/9

    बहरीनचा (Bahrain) राष्ट्रीय दिवस १६ डिसेंबर रोजी राष्ट्रीय दिवस १६ डिसेंबर असला तरी त्यांना १५ ऑगस्ट १९७१ रोजी ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले. (Photo – Reuters)

  • 5/9

    आफ्रिकेतील रिपब्लिकन ऑफ द काँगो (Republic of the Congo) या देशाला १५ ऑगस्ट १९६० रोजी फ्रेंच राजवटीपासून मुक्तता मिळाली. त्यानंतर हा देश डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ काँगो बनला. १८८० पासून काँगो फ्रान्सच्या ताब्यात होता. तेव्हा तो फ्रेंच काँगो म्हणून ओळखले जात होता. (Photo – CNS/Reuters/Justin Makangara)

  • 6/9

    भारताचा स्वातंत्र्य दिन जसा १५ ऑगस्ट रोजी साजरा होतो, तसा लिच्टेन्स्टाईनचा (Leichenstein) स्वातंत्र्य दिनही १५ ऑगस्ट रोजीच असतो. हा देश अनेक वर्षे जर्मनीच्या ताब्यात होता. पण १५ ऑगस्ट १८६६ रोजी लिच्टेन्स्टाईनने जर्मनीच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळवले. केवळ १६० चौरस किलोमीटर एवढ्याच क्षेत्रफळाचा हा युरोपातील छोटासा देश आहे. (Photo – Arnd Wiegmann / Reuters)

  • 7/9

    भारतात यंदा विकसित भारत या संकल्पनेवर आधारित स्वातंत्र्य दिन साजरा केला जाणार आहे. (Express Photo by Ganesh Shirsekar)

  • यंदा १५ ऑगस्ट रोजी आपण भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहोत. भारताला जसे ब्रिटिशांपासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले. तसेच जगात इतर देशांनाही याच दिवशी निरनिराळ्या वर्षी स्वातंत्र्य मिळालेले आहे. (Express Photo by Vishal Srivastav)
  • 8/9

    पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यंदा अकराव्यांदा लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करतील. तिसऱ्यांदा सत्ता स्थापन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला काय संबोधित करतात, याकडे सर्वांचे लक्ष असेल. (Photo – PTI)

TOPICS
आंतरराष्ट्रीय बातम्याInternational Newsट्रेंडिंग न्यूजTrending Newsपंतप्रधान नरेंद्र मोदीPM Narendra Modiस्वातंत्र्य दिन २०२५Independence Day 2025

Web Title: Which countries celebrate independence day on august 15 besides india kvg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.