-
शिवसेनेत मोठी फुट निर्माण झाली ती एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडामुळे.
-
राज्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्वकाही आलबेल असताना अचानक, २० जून २०२२ या दिवशी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी अनेक आमदारांना घेऊन गुजरातमधील सुरत गाठले.
-
त्यानंतर शिवसेनेतील बंड उघडे पडले, तर ३० जुन २०२२ रोजी शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. नंतर त्यांनी शिवसेनेवर दावाही केला.
-
दरम्यान संयुक्त शिवसेनेत असताना त्यांनी आतापर्यंत किती विधानसभा निवडणुका जिंकल्या आहेत, तसेच किती मताधिक्य घेतले होते हे जाणून घेऊयात.
-
२००४ विधानसभा
साल २००४ मध्ये पहिल्यांदा एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढले, यावेळी त्यांनी ठाणे मतदारसंघ निवडला होता. या निवडणुकीत त्यांना एकूण २ लाख ३३ हजार मतदान मिळाले. तर ३७ हजार ८७८ इतके मताधिक्य मिळाले. -
२००९ विधानसभा
दुसर्यांदा एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी कोपरी- पाचपखाडी हा मतदारसंघ निवडला. यावेळी त्यांना एकूण ७३ हजार ५०२ मते मिळाली. तर ३२ हजार ६७६ मतांची त्यांनी आघाडी घेतली होती. -
२०१४ विधानसभा
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना युती नसतानाही एकनाथ शिंदे यांना १ लाख १४८ मते मिळाली होती. कोपरी- पाचपखाडी मतदारसंघामध्ये त्यांनी भाजपचे उमेदवार संदीप लेले यांचा पराभव केला होता. -
२०१९ विधानसभा
कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या तिकिटावर चौथ्यांदा निवडणूक लढवली. ८९ हजार ३०० मताधिक्क्याने त्यांचा विजय झाला. तर एकूण १ लाख १३ हजार मतदान झाले. -
या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस उमेदवार संजय घाडीगावर यांचा पराभव करून सलग चौथा विजय प्राप्त केला. (सर्व फोटो: लोकसत्ता संग्रहित)
Eknath Shinde : २००४ ते २०१९ पर्यंत झालेल्या चार विधानसभा निवडणुकांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मिळालं ‘इतकं’ मताधिक्य, वाचा माहिती
संयुक्त शिवसेनेत असताना एकनाथ शिंदे यांनी आतापर्यंत किती विधानसभा निवडणुका जिंकल्या आहेत, तसेच किती मताधिक्य घेतले आहे हे जाणून घेऊयात.
Web Title: Eknath shinde 2004 to 2019 vidhansabha election history votes and lead spl