• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. devendra fadanvis reply shivsena leader ramdas kadam latest statement spl

“भाजपाबाबत वारंवार अशा प्रकारची वक्तव्ये मान्य नाहीत”, देवेंद्र फडणवीस यांच्याकडून रामदास कदम यांची कानउघाडणी

भाजपाला राक्षसी महत्त्वाकांक्षा असेल, तर युती तोडून स्वतंत्र लढावे, असे कदम यांनी म्हटले आहे. त्यांच्या वक्तव्याची फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे.

August 20, 2024 13:03 IST
Follow Us
  • devendra fadnvis vs ramdas kadam
    1/9

    “रामदास कदम हे वारंवार अगदी टोकाचे बोलतात. त्यांची जी काही मते आहेत, ती त्यांनी पक्षांतर्गत बैठकांमध्ये मांडावीत, जाहीरपणे मांडू नयेत. प्रत्येक वेळी भाजपला वेठीला धरू नये. मी कदम यांची भूमिकाही समजून घेईन. पण आम्हीही माणसे आहोत. आमचीही मने दुखावतात. त्यांच्या वक्तव्यानंतर आम्हालाही ५० गोष्टींवर बोलता येईल. पण जे मोठे नेते आहेत, त्यांनी पथ्य पाळले पाहिजे. भाजपबाबत वारंवार अशा प्रकारची वक्तव्ये आम्हाला मान्य नाहीत. त्यामुळे या संदर्भात मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार आहे.” असे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोप करणाऱ्या रामदास कदमांना सुनावले. (Photo: Devendra Fadanvis@Fb)

  • 2/9

    चमकोगिरी करणारे सार्वजनिक बांधकाम मंत्री कुचकामी असल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा, असे वादग्रस्त वक्तव्य शिवसेना शिंदे गटातील माजी मंत्री रामदास कदम यांनी केल्याने महायुतीतील नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर आला आहे.

  • 3/9

    मुंबई-गोवा महामार्गाच्या दुर्दशेवरून महायुतीतील नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. (Photo: Devendra Fadanvis@Fb)

  • 4/9

    भाजपाला राक्षसी महत्त्वाकांक्षा असेल, तर युती तोडून स्वतंत्र लढावे, असे कदम यांनी म्हटले आहे. त्यांच्या वक्तव्याची फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे. (Photo: Devendra Fadanvis@Fb)

  • 5/9

    काय म्हणाले होते रामदास कदम?
    “समृद्धी महामार्गाचे काम तीन वर्षात झाले आहे. पण मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १० वर्षे सुरू आहे. चव्हाण हे कुचकामी मंत्री आहेत. त्यामुळे या महामार्गावरून प्रवास करताना जनतेला अनेक वर्षे त्रास सहन करावा लागत आहे. त्यांना शिवसेनेची अॅलर्जी आहे.”, अशी टीका कदम यांनी केल्याने त्याची भाजपमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. (Photo: Ramdas kadam@Fb)

  • 6/9

    चव्हाण यांनी कदम यांच्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे नमूद केले आहे. (Photo: Ramdas kadam@Fb)

  • 7/9

    कदम यांच्या वक्तव्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील भाजप नेत्यांमध्येही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. (Photo: Devendra Fadanvis@Fb)

  • 8/9

    कदम यांचा भाजपचे माजी आमदार विनय नातू यांना प्रखर विरोध आहे. नातू यांच्यामुळे काही वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्याचे शल्य कदम यांना अजूनही आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी दापोली व गुहागर मतदारसंघातील उमेदवारीवरून महायुतीमध्ये जोरदार वादावादी सुरू आहे. (Photo: Devendra Fadanvis@Fb)

  • 9/9

    ह् देखील वाचा: Nawab Malik : नवाब मलिक अजित पवारांच्या यात्रेत सहभागी; मुलीची प्रवक्तेपदी निवड, पाहा…

TOPICS
एकनाथ शिंदेEknath Shindeदेवेंद्र फडणवीसDevendra Fadnavisभारतीय जनता पार्टीBJPमराठी बातम्याMarathi Newsरामदास कदमRamdas KadamशिवसेनाShiv Sena

Web Title: Devendra fadanvis reply shivsena leader ramdas kadam latest statement spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.