• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • सरन्यायाधीश भूषण गवई
  • PM नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. rahul gandhi arrives in us visit for first time as leader of the opposition spl

Rahul Gandhi US visit : विरोधी पक्षनेते झाल्यांनतर राहुल गांधी पहिल्यांदाच अमेरिका दौऱ्यावर, भारतीय नागरिकांशी साधणार संवाद

काँग्रेस नेते राहुल गांधी तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. त्याच्या या दौऱ्यातून त्यांन खूप अपेक्षा आहेत.

Updated: September 8, 2024 15:37 IST
Follow Us
  • Rahul Gandhi arrives in Dallas for US visit, Rahul Gandhi US visit
    1/9

    लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी आज टेक्सासमधील डॅलस येथे पोहोचले. त्यांचा तीन दिवसांचा अमेरिका दौरा आजपासून सुरू होत आहे.

  • 2/9

    या दौऱ्यात ते विविध कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीही या महिन्यात अमेरिकेला भेट देणार आहेत अशा वेळी राहुल गांधी हा दौरा करत आहेत.

  • 3/9

    यावेळी इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा आणि सहकारी भारतीयांनी विमानतळावर राहुल गांधींचे जोरदार स्वागत केले.

  • 4/9

    दरम्यान तिथे पोहोचल्यानंतर सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये राहुल गांधी व्यक्त झाले आहेत.

  • 5/9

    फेसबुकवरील एका पोस्टमध्ये गांधी म्हणाले, “मी या दौऱ्या दरम्यान अर्थपूर्ण चर्चा आणि व्यावहारिक संवाद साधण्यास उत्सुक आहे, ज्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ होतील.” आपल्या दौऱ्यात गांधी वॉशिंग्टन डीसी आणि डॅलसमध्ये अनेक चर्चा करतील. यावेळी ते टेक्सास विद्यापीठालाही भेट देणार आहेत.

  • 6/9

    ते स्थानिक भारतीय समुदाय आणि काही ‘टेक्नोक्रॅट्स’नाही भेटणार आहेत. डॅलसमधील नेत्यांसोबत डिनरही करणार आहेत. इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे प्रमुख आणि राहुल गांधी यांचे निकटवर्तीय सॅम पित्रोदा यांच्या मते, ते वॉशिंग्टन डीसीलाही भेट देतील, जिथे त्यांची विविध लोकांशी चर्चा करण्याची योजना तयार आहे. अशी माहिती ३१ ऑगस्ट रोजी सॅम पित्रोदा यांनी दिली होती.

  • 7/9

    दरम्यान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते झाल्यानंतर राहुल गांधी यांचा हा पहिलाच अमेरिका दौरा आहे.

  • 8/9

    पंतप्रधान नरेंद्र मोदी २२ सप्टेंबर रोजी न्यूयॉर्कमधील लाँग आयलँड येथील नासाऊ वेटरन्स मेमोरियल कोलिझियम येथे एका विशाल सामुदायिक कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत.
    (Photos: Rahul Gandhi/Facebook)

  • 9/9

    हेही वाचा: शाहरुख खान, अमिताभ बच्चन यांच्यापेक्षा जास्त मालमत्ता ‘या’ कुटुंबाकडे; बॉलीवूडमधील सर…

TOPICS
अमेरिकाAmericaकाँग्रेसCongressमराठी बातम्याMarathi Newsराहुल गांधीRahul Gandhi

Web Title: Rahul gandhi arrives in us visit for first time as leader of the opposition spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.