-
काल सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सशर्त जामीन मंजूर केला आहे. ते दिल्ली मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणात जेलमध्ये होते. दरम्यान, केजरीवाल यांच्या अगोदर तुरुंगवास झालेल्या काही मुख्यमंत्र्यांबद्दल जाणून घेऊयात. (Photo- Inidan Express)
-
बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यांना चारा घोटाळ्याशी संबंधित चार प्रकरणांमध्ये १४ वर्षांची शिक्षा झाली होती. ही प्रकरणे दुमका, देवघर आणि चाईबासा कोषागारातून पैसे काढण्याशी संबंधित होती. (Photo- ANI)
-
बिहारचे तीन वेळ मुख्यमंत्री राहिलेल्या जगन्नाथ मिश्रा यांनाही चारा घोटाळा प्रकरणी तुरुंगात जावे लागले होते. (Photo- Jansatta)
-
बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांना बंगळुरुच्या विशेष न्यायालयाने चार वर्षांची शिक्षा आणि १०० कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. न्यायालयाने शिक्षा सुनावल्यामुळे जयललिता यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागले होते. (Photo- Jansatta)
-
हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांना १० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. तीन हजार शिक्षकांच्या भरतीत गैरव्यवहार केल्याप्रकरणी त्यांचा मुलगा आणि इतर ५३ जणांना विशेष सीबीआय न्यायालयाने दोषी ठरविले होते. (Photo- Inidan Express)
-
झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधु कोडा यांना कोळसा खाण वाटप घोटाळ्याप्रकरणी विशेष न्यायालयाने तीन वर्षांची शिक्षा सुनावली होती. (Photo- Inidan Express)
-
कोट्यवधी रुपयांच्या कौशल्य विकास महामंडळ घोटाळा प्रकरणात तेलुगू देसम पक्षाचे प्रमुख आणि आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना तुरुंगात जावे लागले होते. (Photo- Jansatta)
-
कथित जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे तरुंगात होते काही दिवसांपूर्वी त्यांना जमीन मिळाला आहे. (Photo- Jansatta)
Chief Ministers : अरविंद केजरीवाल यांच्याआधी ‘या’ मुख्यमंत्र्यांनाही जावे लागले तुरुंगात, वाचा माहिती
Chief Ministers In Jail : मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना ज्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात जावे लागले त्यांची यादी इथे जाणून घ्या.
Web Title: Chief ministers in jail arvind kejriwal laluprasad yadav hemant soren chandrababu naidu spl