-
शिवसंग्राम संघटनेच्या नेत्या ज्योती मेटे यांच्यासह सलीम पटेल, बाळासाहेब खोसे यांनी शरद पवार गटात प्रवेश केला.
-
शरद पवारांच्या उपस्थितीत त्यांचा पक्ष प्रवेश पार पडला.
-
यावेळी खासदार सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या.
-
शरद पवारांकडून ज्योती मेटेंना बीडमधून उमेदवारी देण्यात येणार असल्याची माहिती आहे.
-
दरम्यान महायुतीने शिवसंग्रामला दिलेल्या शब्दांची पूर्तता झाली नाही तर आम्ही सन्मानजनक जागा देतील त्यांच्यासोबत जाणार, असे ज्योती मेटे यांनी म्हटले होते.
-
“राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात प्रवेश करत असताना विधानसभा निवडणुकीचेच कारण आहे. आमची शिवसंग्राम संघटना समाजकारण करते. त्यामुळे समाजकारणाला राजकारणाची जोड देऊन पुढे जाण्यासाठी हा पक्ष प्रवेश केला आहे. बीड विधानसभा मतदारसंघासाठी आम्ही आमचा प्रस्ताव मांडलेला आहे. आमची यासंदर्भात चर्चा झालेली आहे. त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला. त्यामुळे आम्ही पक्षाने सांगितलेली सर्व जबाबदारी योग्य पद्धतीने पार पडणार आहोत”, अशी प्रतिक्रिया ज्योती मेटे यांनी पक्ष प्रवेश केल्यानंतर दिली.
-
दरम्यान, शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाल्यानंतर त्यांच्या पत्नी ज्योती मेटे यांना शिवसंग्राम संघटनेच्या अध्यक्षपदी एकमताने निवडण्यात आले होते.
-
त्यांच्या नेतृत्वाखाली, संघटना आगामी निवडणुकांमध्ये किमान ५ विधानसभा जागा लढवण्याचा निर्धार केला आहे.
-
दरम्यान, ज्योती मेटेंचा राजकीय प्रवास त्यांच्या पतीच्या वारशावर आधारित असून, त्यांनी समाजकारणाला प्राधान्य देऊन राजकारणात सक्रिय होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसंग्राम संघटना आगामी निवडणुकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते.
-
दरम्यान, विनायक मेटेंनी २०१९ च्या लोकसभा आणि विधानसभा महायुतीला पाठिंबा दिलेला होता.
-
(सर्व फोटो साभार शिवसंग्राम संघटना सोशल मीडिया)
विधानसभा निवडणुकीआधी ज्योती मेटेंच्या हाती ‘तुतारी’, कोण आहेत ‘शिवसंग्राम’च्या नेत्या?
Jyoti Mete Shivsangram : दरम्यान महायुतीने शिवसंग्रामला दिलेल्या शब्दांची पूर्तता झाली नाही तर आम्ही सन्मानजनक जागा देतील त्यांच्यासोबत जाणार, असे ज्योती मेटे यांनी म्हटले होते.
Web Title: Shiv sangram party leader jyoti mete joined ncp sharad pawar party and maharashtra vidhansabha election 2024 in beed know about she spl