scorecardresearch

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार

राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी १९९९ मध्ये केली होती. या पक्षाचा प्रभाव महाराष्ट्रात अधिक आहे. मात्र २०२३ मध्ये या पक्षाला घरघर लागली. अजित पवार यांनी मूळ राष्ट्रवादी सोडून आपला एक वेगळा गट तयार केला. महाराष्ट्रात शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीचेही दोन गट झाले. हे दोन्ही गट शरद पवार गट (Sharad Pawar NCP) आणि अजित पवार गट (Ajit Pawar NCP) या नावाने ओळखले जातात.


शिवसेनेतून फुटल्यानंतर एकनाथ शिंदे गटाने जशी भाजपाची साथ स्वीकारली त्याच मार्गावर अजित पवार आपल्या समर्थकांसह गेले. या बंडखोरीचा शरद पवार गटाला मोठा फटका बसेल असे समजले जात होते. मात्र वयाच्या ८३ व्या वर्षीही शरद पवार यांनी पक्षाची धुरा सांभाळत पक्ष संघटना मजबूत करण्याचे प्रयत्न केले. समर्थकांना एकत्रित करून तरुणांना संधी देत गटाला उभारणी दिली.


२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार (Sharad Pawar) यांनी काँग्रेस, शिवसेनेसह महाराष्ट्रात भाजपाच्या महायुतीला पराभवाची धूळ चारली. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, शिवसेना आणि काँग्रेस यांच्या माविकास आघडीने ४८ पैकी ३० जागांवर विजय मिळवला. यात शरद पवार यांच्या गटाला ९ जागा मिळवण्यात यश आले. विशेष म्हणजे, शरद पवार गटाला १० पैकी ९ जागा जिंकण्यात यश आले. तर अजित पवार (Ajit pawar) गटाला चार जागा मिळाल्या होत्या, त्यांना केवळ एकच जागा जिंकता आली. शरद पवार गटात सुप्रिया सुळे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार, अनिल देशमुख आणि इतर नेते कार्यरत आहेत. तुतारी हे शरद पवार गटाचे चिन्ह आहे.


Read More
Activists are protesting against the molestation case against Manohar Sapate in Solapur
सोलापुरात मनोहर सपाटेविरुद्ध आंदोलन; प्रतिमेला जोडे, विनयभंग गुन्ह्याबद्दल कार्यकर्ते रस्त्यावर

छत्रपती शिवाजी प्रशाला आणि वरिष्ठ महाविद्यालयाची पालक संस्था असलेल्या ६५ वर्षे जुन्या मराठा समाज सेवा मंडळाचे सपाटे हे अध्यक्ष आहेत.…

Ajit Pawar group youth leader commits suicide seven people including Sharad Pawar group leader including his wife face charges
अजित पवार गटाच्या युवक नेत्याची आत्महत्या; पत्नीसह शरद पवार गटाच्या नेत्यासह सात जणांवर गुन्हा

कौटुंबिक कारणांवरून त्रास देऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे स्थानिक नेते, माजी उपमहापौर पद्माकर ऊर्फ नाना काळे…

NCP sharad pawars Former MLA Vijay Bhamble has decided to join Deputy Chief Minister Ajit Pawars NCP
विजय भांबळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत

आपल्या समर्थकांसह त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली. भांबळे यांच्या या निर्णयाने जिंतूर तालुक्यातील राजकारण अधिक गुंतागुंतीचे होईल असे मानले…

nagpur NCP leader supriya sule questions bjp quality control over new joinings
सुषमा स्वराज आमच्या ‘हिरो’ होत्या, मात्र आज या पक्षात ‘क्वॉलिटी कंट्रोल’… सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या….

भाजपमध्ये गेल्या काही वर्षात मोठया प्रमाणात इनकमिंग झाले. राष्ट्रवादीत तसे नाही का, असे विचारल्यावर त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Kalwa Raj thackeray Uddhav thackeray Sharad Pawar photo same banner
कळव्यात राज, उद्धव आणि शरद पवारांचे एकत्र बॅनर

कळवा येथे शरद पवार यांच्या कार्यकर्त्यांनी फलक उभारले आहेत. त्यामध्ये ‘चला मुंबईत’ असे म्हटले आहे. तसेच फलकावर राज ठाकरे, उद्धव…

Supriya Sule On Protest Against Hindi Imposition
हिंदी सक्तीविरोधातील ठाकरेंच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार का? सुप्रिया सुळे म्हणाल्या, “हा विषय…”

Hindi Imposition: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शालेय शिक्षणातील हिंदी सक्तीविरोधात ५ जुलै रोजी मुंबईतील गिरगाव चौपाटी ते…

संबंधित बातम्या