-   महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचं रणशिंग वाजलेलं असून प्रचाराच्या फैरी उडत आहेत. 
-  राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी मुख्य लढत पाहायला मिळत आहे. 
-  एवढच नाही तर आता दोन्ही आघाड्यामध्ये ३ पक्ष असणारी ही पहिलीच निवडणूक होत आहे. 
-  त्यामुळे राज्यातील सत्ता नेमकी कोणाला मिळणार याबद्दल जोरदार उत्सुकता आहे. दरम्यान काल ६ नोव्हेंबर रोजी महाविकास आघाडीने जाहीरनामा प्रसिद्द केला आहे. यावेळी त्यांनी एक पंचसूत्री जाहीर केली आहे, चला तर मग याबद्दल जाणून घेऊ. 
-  
-  १. राज्यातील महिलांना महिना ३ हजार रुपये देणार. तसेच महिलांना एसटीचा प्रवासही मोफत असणार. 
-  २. बेरोजगार तरुणांना महिन्याला ४ हजार रुपये मिळणार 
-  ३. शेतकऱ्यांची ३ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी केली जाणार 
-  ४. २५ लाख रुपयांपर्यंत आरोग्य विमा, आणि औषधे मोफत मिळणार. 
-  ५. जातनिहाय जनगणना करणार आणि अरक्षणामध्ये वाढ करण्यासाठी प्राधान्य देणार. 
-  (सर्व फोटो साभार- राहुल गांधी फेसबूकल पेज) 
 हेही पाहा – Photos : ‘तारक मेहता…’ फेम बबिता करतेय कझाकस्तानमध्ये भ्रमंती, फोटो व्हायरल
Maha Vikas Aghadi : महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार तर शेतकऱ्यांना… मविआची विधानसभा निवडणुकीची पंचसूत्री जाहीर!
MVA manifesto Panchsutri 2025 : महाविकास आघाडीने नुकताच जाहीरनामा प्रसिद्द केला आहे. चला याबद्दल जाणून घेऊ.
Web Title: Maha vikas aghadi announced panchsutri at swabhiman sabha at bkc assembly election 2024 spl