-
डॉ. आंबेडकरांच्या मूल्यांचे पालन करणाऱ्या राजकीय पक्षाचा मी सदस्य आहे. आम्ही कधीही आंबेडकरांचा अपमान केलेला नाही. उलट, काँग्रेस आंबेडकरविरोधी असल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे, असे प्रत्युत्तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनीकाल पत्रकार (१८ डिसेंबर) परिषदेत दिले.
-
राज्यसभेतील शहांच्या आंबेडकरांसंदर्भातील विधानावरून काँग्रेसने शहा आंबेडकरविरोधी असल्याचा आरोप केला. (Photo: PTI)
-
काँग्रेसने माझ्या राज्यसभेतील विधानांची तोडमोड केली असून चुकीचा अर्थ काढला आहे. मोदींची भाषणेही संपादित करून काँग्रेसने प्रसारित केली आहेत. प्रसारमाध्यमांनी माझी पूर्ण विधाने दाखवावीत, असे आवाहन शहांनी केले.
-
काँग्रेसने लष्कर, महिलांचा अपमान केला. देशाचा भूभाग दुसऱ्या देशाच्या स्वाधीन केला. काँग्रेसचे हे कारनामे उघड झाल्यामुळे ते सत्याची मोडतोड करण्याचा प्रयत्न करत आहे व लोकांची दिशाभूल करत आहे, असा आरोप शहांनी केला.
-
काँग्रेसने डॉ. आंबेडकरांना भारतरत्न दिले नाही, उलट ते मिळू नये असाच काँग्रेसचा प्रयत्न होता. – अमित शाहा
-
आंबेडकरांबद्दल नेहरूंच्या मनात द्वेष होता ही बाब जगजाहीर आहे. मोदी सरकारने मात्र आंबेडकरांचा सन्मान केला. – अमित शाहा
-
केंद्रात भाजपचे सरकार आल्यानंतर आंबेडकरांची स्मारके उभारली गेली. २६ नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून साजरा होऊ लागला, असे शहा म्हणाले.
-
‘भाजपाचा मनुस्मृतीवर विश्वास’
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी बुधवारी पत्रकार परिषदेत मोदींवर शहांचा बचाव केल्याचा आरोप केला. डॉ. आंबेडकरांचा अपमान करणाऱ्या मंत्र्याला मोदींनी मंत्रिमंडळातून ताबडतोब काढून टाकायला हवे होते असे ते म्हणाले. (Photo: Jansatta) -
तर, गृहमंत्र्यांनी देशाची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली. (Photo: Jansatta)
-
डॉ. आंबेडकरांचे योगदान व संविधान नष्ट करण्यासाठी भाजप प्रयत्न करत आहे, अशी टीका त्यांनी केली. (Photo: Jansatta)
-
(सर्व फोटो साभार- अमित शाह सोशल मीडिया)
Photos : “माझ्या राज्यसभेतील विधानांची….”; गृहमंत्री अमित शाहांचे आंबेडकरांबद्दलच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण, म्हणाले…
Amit shah on ambedkar marathi news : आंबेडकरांबद्दल नेहरूंच्या मनात द्वेष होता ही बाब जगजाहीर आहे. मोदी सरकारने मात्र आंबेडकरांचा सन्मान केला. – अमित शाहा
Web Title: Amit shah press on ambedkar statement spl