Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. pushpak express train accident how the rumor of fire in pushpak express spread spl

Pushpak Express Train Accident: पुष्पक एक्सप्रेसमध्ये आग लागल्याची अफवा नेमकी कशी पसरली?

How the rumor of fire in Pushpak Express spread: राज्यातील जळगाव जिल्ह्यातील परंडा रेल्वे स्थानकावर भीषण अपघात झाला असून त्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. पण आगीची अफवा कशी पसरली?

Updated: January 22, 2025 22:02 IST
Follow Us
  • Passengers Jump Over Fire Rumor
    1/9

    महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील परंडा रेल्वे स्थानकावर भीषण अपघात झाला आहे. येथे अफवेमुळे अनेकांना जीव गमवावा लागला. खरंतर, पुष्पक एक्स्प्रेसमध्ये अचानक आग लागल्याची अफवा पसरली आणि त्यानंतर प्रवाशांनी ट्रेनमधून उड्या मारायला सुरुवात केली. आगीची अफवा कशी पसरली ते जाणून घेऊया (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

  • 2/9

    पुष्पक एक्स्प्रेस ट्रेनला अचानक आग लागल्याची अफवा पसरताच लोकांनी जीव वाचवण्यासाठी ट्रेनमधून उड्या मारायला सुरुवात केली. दरम्यान, कर्नाटक एक्स्प्रेस दुसऱ्या रुळावर आली आणि तिची धडक बसून अनेकांचा मृत्यू झाला. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

  • 3/9

    ही घटना सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. ट्रेनला आग लागल्याचे समजताच ते घाबरले आणि त्यांनी आपला जीव वाचवण्यासाठी ट्रेनमधून बाहेर पडायला सुरुवात केली. दरम्यान, प्रवाशांनी ट्रेनची चेन खेचली आणि ट्रेन थांबली. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

  • 4/9

    पुष्पक एक्सप्रेस ट्रेन लखनौहून मुंबईला जात होती. गाडी थांबताच लोक घाईघाईने उतरू लागले आणि त्याच क्षणी मनमाडहून भुसावळला जाणारी कर्नाटक एक्स्प्रेस गाडी दुसऱ्या रुळावर आली. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

  • 5/9

    असे सांगण्यात येत आहे की, पुष्पक एक्सप्रेस परंडा रेल्वे स्थानकाजवळ येत असताना ट्रेनच्या मोटरमनने ब्रेक लावला आणि चाकांमधून ठिणग्या निघू लागल्या. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

  • 6/9

    दरम्यान, ट्रेनला आग लागल्याची अफवा प्रवाशांमध्ये पसरली, त्यानंतर लोकांनी डब्यातून उड्या मारायला सुरुवात केली. (फोटो-ANI)

  • 7/9

    रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, भुसावळचे डीआरएम अपघातस्थळी दाखल झाले आहेत. तेथे वैद्यकीय पथकही पाठवण्यात आले आहे. रेल्वेचे वैद्यकीय पथक आणि बचाव पथकही तेथे पोहोचले आहे. ते म्हणाले की सुमारे 30-35 प्रवाशांनी घाबरून चालत्या ट्रेनमधून उडी मारल्याचा संशय आहे, त्यापैकी काहींचा ट्रेनला धडकल्याने मृत्यू झाला. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

  • 8/9

    या अपघातात आतापर्यंत या घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला आहे तर काही जण गंभीर जखणी आहेत. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

  • 9/9

    दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (प्रातिनिधिक छायाचित्र)

TOPICS
जळगावJalgaonमराठी बातम्याMarathi Newsरेल्वेRailwayरेल्वे अपघातRailway Accident

Web Title: Pushpak express train accident how the rumor of fire in pushpak express spread spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.