• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. terror attack in kashmirs mini switzerland 27 killed in pahalgams baisaran valley spl

काश्मीरमधील बैसरन व्हॅलीला ‘मिनी स्वित्झर्लंड’ही म्हणतात, पहलगाम पर्यटकांची पहिली पसंती का आहे? जाणून घ्या…

Pahalgam Valley: जम्मू आणि काश्मीरच्या व्हॅली जगभरातील पर्यटकांना आकर्षित करतात. यापैकीच एक पहलगाम आहे, ज्याला ‘मिनी स्वित्झर्लंड’ असेही म्हणतात. पण २२ एप्रिल २०२५ हा दिवस या सुंदर ठिकाणासाठी इतकी काळा ठरला की येथील सौंदर्य रक्ताने माखले गेले.

April 23, 2025 16:33 IST
Follow Us
  • Search ops for attackers
    1/13

    जम्मू आणि काश्मीरच्या मधील खोऱ्यांना पृथ्वीवरील स्वर्ग म्हटले जाते आणि पहलगाम खोरे या दऱ्यांचा मुकुट मानला जातो. पण याच स्वर्गात मंगळवारी २२ एप्रिल रोजी अशी एक दुःखद घटना घडली जीने संपूर्ण देशाला हादरवून टाकले आहे. (PTI Photo)

  • 2/13

    पहलगामच्या बैसरन व्हॅलीमध्ये दहशतवाद्यांनी २७ पर्यटकांवर भ्याड हल्ला केला, ज्यामध्ये २ परदेशी नागरिकांसह अनेक लोक ठार झाले. या हल्ल्याची जबाबदारी लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. (PTI Photo)

  • 3/13

    मृतांमध्ये इटली आणि इस्रायलमधील पर्यटक तसेच गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आणि ओडिशातील पर्यटकांचा समावेश होता. हा हल्ला पहलगामपासून फक्त ६ किलोमीटर अंतरावर असलेल्या बैसरन व्हॅली – पर्यटक ज्याला ‘मिनी स्वित्झर्लंड’ म्हणतात येथे झाला आहे. (PTI Photo)

  • 4/13

    पहलगाम पर्यटकांची पहिली पसंती का आहे?
    पहलगामला ‘मेंढपाळांचे खोरे’ आणि ‘काश्मीरचे स्वित्झर्लंड’ असेही म्हणतात. हिमालयाच्या कुशीत वसलेला हा प्रदेश नैसर्गिक सौंदर्य, शांत वातावरण आणि साहसी उपक्रमांसाठीचा अद्भुत संगम आहे. (Photo: Pexels)

  • 5/13

    २,१३० मीटर उंचीवर वसलेले हे ठिकाण ट्रेकिंग, कॅम्पिंग, रिव्हर राफ्टिंग आणि पॅराग्लायडिंग सारख्या क्रियाकलापांसाठी प्रसिद्ध आहे. येथून वाहणारी लिद्दर नदी आणि आजूबाजूला पसरलेली दाट पाइनची जंगले, बर्फाच्छादित उंच पर्वतं आणि हिरवळ या गोष्टी या ठिकाणाला आणखी खास बनवतात. (Photo: Pexels)

  • 6/13

    पहलगामची मुख्य आकर्षणे:
    बैसरन व्हॅली –
    पहलगाममधील ही व्हॅली बर्फाळ दृश्ये, गवताळ प्रदेश आणि झिपलाइनिंगसारख्या साहसी क्रियाकलापांसाठी प्रसिद्ध आहे. (Photo: Pexels)

  • 7/13

    अरु व्हॅली – ट्रेकिंग आणि तलाव भेटीसाठी प्रसिद्ध, हे पहलगामपासून १२ किमी अंतरावर आहे. (Photo: Pexels)

  • 8/13

    बेताब व्हॅली – ‘बेताब’ चित्रपटामुळे प्रसिद्ध झालेली ही व्हॅली बॉलिवूडप्रेमींसाठी एक आवडते चित्रीकरण ठिकाण आहे. (Photo: Pexels)

  • 9/13

    चंदनवाडी – अमरनाथ यात्रेचा प्राचीन मार्ग येथून सुरू होतो आणि यावरून त्याचे धार्मिक महत्त्व दिसून येते. (Photo: Pexels)

  • 10/13

    बैसरन व्हॅली हल्ला:
    बैसरन व्हॅली पाहून लोक अनेकदा म्हणतात की ते स्वर्गात आहेत. पण यावेळी स्वर्गातून किंकाळ्या घुमल्या. दहशतवाद्यांनी सुट्टी साजरी करण्यासाठी आलेल्या लोकांची प्रथम नावे विचारली आणि नंतर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. (Photo: Pexels)

  • 11/13

    काश्मीरमधील दहशतवाद आणि पर्यटन संघर्ष
    तुम्हाला सांगतो की, काश्मीर नेहमीच सौंदर्य आणि दहशत या दोन अक्षांमध्ये झुलत राहिले आहे. एकीकडे, या ठिकाणाचे नैसर्गिक सौंदर्य जगभरातील लोकांना आकर्षित करते, तर दुसरीकडे, दहशतवादी घटनांमुळे या स्वर्गात नेहमी भीती पसरलेली असते. (Photo: Pexels)

  • 12/13

    सरकार आणि सुरक्षा संस्थांना आता अशा घटना पुन्हा घडू नयेत आणि पर्यटकांना काश्मीरच्या खोऱ्यांचा आनंद न घाबरता घेता येईल याची खात्री करावी लागेल. (Photo: Pexels)

  • 13/13

    दहशतवादाचा परिणाम
    काश्मीरमधील दऱ्या, तलाव आणि बर्फाच्छादित पर्वत त्यांच्या वेगळेपणा आणि सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहेत, परंतु तेथील रहिवासी आणि पर्यटकांना आता सुरक्षिततेबाबत अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. पहलगामचे सुंदर आणि शांत वातावरण आता दहशतवादी घटनांनी ग्रासले आहे, ज्यामुळे काश्मीरच्या पर्यटन उद्योगावर परिणाम होऊ शकतो. (Photo: Pexels)

TOPICS
काश्मीरKashmirजम्मू आणि काश्मीरJammu And Kashmirट्रेंडिंगTrendingट्रेंडिंग टूडेTrending Todayट्रेंडिंग न्यूजTrending Newsट्रेंडिंग फोटोTrending Photoदहशतवादी हल्लाTerror Attack

Web Title: Terror attack in kashmirs mini switzerland 27 killed in pahalgams baisaran valley spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.