-
पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने काल मध्यरात्री पाकिस्तानच्या ९ दहशतवादी तळांवर हवाई हल्ला केला आहे. या हल्ल्यानंतर विविध स्तरांतून प्रतिक्रियांचा पाऊस पडतो आहे.
-
त्यातच आता पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांच्या भावना समोर आल्या आहेत. विविध माध्यमांशी बोलताना त्यांनी सरकारच्या हवाई हल्ल्याच्या कारवाईवर समाधानी असल्याची भावना व्यक्त केली आहे. (संग्रहित छायाचित्र)
-
पाकिस्तानला संपवून टाकावं – गणबोटे कुटुंबीय
सिंदूर हे अतिशय योग्य नाव दिलं आहे. यातून सर्व महिलांचा सन्मान होत आहे अजूनही त्या दुःखातून मी बाहेर आलेले नाही आहे. पण आता जो हल्ला केला आहे त्यामुळे मला असं वाटतंय की मी या नैराश्यातून बाहेर येईल, मोदींनी उचललेलं हे पाऊल योग्य आहे. खरोखरचं पाकिस्तानला संपवून टाकावं. (छायाचित्र: एएनआय) -
प्रतिउत्तराची आम्ही वाट पाहत होतो, सरकारने ते केलं त्यासाठी सरकारचे आभार मानतो. सिंदूर नाव योग्य दिलं आहे. आईसमोर वडिलांची हत्या केली, सगळ्यांना मारलं त्याच हे उत्तर मोदींनी अतिशय योग्य दिलं आहे. (छायाचित्र: एपी)
-
हा हल्ला अतिशय योग्य आहे – जगदाळे कुटुंबीय
ऑपरेशन सिंदूर राबवून मोदींनी मृत ३० नागरिकांना एकप्रकारे श्रद्धांजलीच दिली आहे. त्यांनी सिंदूर नाव देऊन आमच्या भावना जाणल्या आहेत. हे नाव देऊन केलेली कारवाई योग्य आहे. हा धडा शिकवणं गरजेचं होतं. (छायाचित्र: एपी) -
माझ्या वडिलांना आज खरी श्रद्धांजली मिळाली. त्यांचं बलिदान वाया गेलं नाही, १५ दिवसांत ही कारवाई केली त्यासाठी सरकारचे आभार मानते , सरकारची कारवाई पाहून सर्व मृतांच्या नातेवाईकांना आज अभिमान वाटतो आहे. (छायाचित्र: एपी)
-
समाधान वाटलं – लेले कुटुंबीय
न्याय मिळाला आहे असं वाटत आहे, पण आणखीन ऑपरेशन्स करावे संपूर्ण दहशतवादाला मुळापासून संपवावं, हवाई हल्ल्याची बातमी पाहून समाधान वाटलं. (छायाचित्र: एपी) -
बचावलेले सुबोध पाटील म्हणाले…
त्यावेळी आम्ही खूप घाबरलेलो होतो, मी एकटाचं बचावलो होतो. जी सरकारने कारवाई केली आहे ते साहजिक आहे. सरकार याचा बदला घेणार याची मला खात्री आहे. (छायाचित्र: रॉयटर्स) -
आत्म्याला आता शांती लाभली असेल – मोने कुटुंबीय
ही कारवाई करून सरकारने बदला घेतल्याचं पाहून समाधान वाटलं, ज्या नागरिकांचं बलिदान गेलं त्यांच्या आत्म्याला आता शांती लाभली असेल. दहशतवाद्यांना समूळ नष्ट करावं अशी माझी मागणी आहे. ही कारवाई पाहून खूप आनंद झाला, भारतान १५ दिवसांतच कारवाई करून यशस्वीरित्या हवाई हल्ला केला. आम्हाला न्याय मिळावा हीच आमची मागणी आहे. (छायाचित्र: एपी) हेही पाहा- भारतीय सैन्याला पाकिस्तानवरील हवाई हल्ल्यासाठी ऑपरेशन ‘सिंदूर’ हे नाव कोणी सुचवलं?
“पाकिस्तानला संपवून…”, ऑपरेशन सिंदूरवर पीडित कुटुंबीयांच्या काय आल्या प्रतिक्रिया?
Operation sindoor : पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने काल मध्यरात्री पाकिस्तानच्या ९ दहशतवादी तळांवर हवाई हल्ला केला आहे. या हल्ल्यानंतर विविध स्तरांतून प्रतिक्रियांचा पाऊस पडतो आहे, त्यातच आता पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांच्या भावना समोर आल्या आहेत. विविध माध्यमांशी बोलताना त्यांनी सरकारच्या हवाई हल्ल्याच्या कारवाईवर समाधानी असल्याची भावना व्यक्त केली आहे.
Web Title: Pahalgam victims families express satisfaction over operation sindoor india pakistan war 2025 spl