Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. in pictures delhi drowns in rain cars submerged flights diverted major traffic jams fehd import kvg

गाड्या पाण्यात बुडाल्या, विमाने वळवली, मोठी वाहतूक कोंडी; दिल्लीत पावासाचा कहर

दिल्लीत रविवारी झालेल्या पावसामुळे झाडे उन्मळून पडली, रस्ते पाण्याखाली गेले आणि जनजीवन अचानक विस्कळीत झाले.

Updated: May 26, 2025 00:28 IST
Follow Us
  • दिल्लीत रविवारी झालेल्या मुसळधार पाऊस आणि वादळामुळे अनेक भाग पाण्याखाली गेले. मोती बाग, मिंटो रोड आणि दिल्ली विमानतळ टर्मिनल १ च्या परिसरातील प्रमुख भागांना मोठा फटका बसला. मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली आणि प्रवाशांना विमान प्रवासात विलंब झाला.
    1/12

    दिल्लीत रविवारी झालेल्या मुसळधार पाऊस आणि वादळामुळे अनेक भाग पाण्याखाली गेले. मोती बाग, मिंटो रोड आणि दिल्ली विमानतळ टर्मिनल १ च्या परिसरातील प्रमुख भागांना मोठा फटका बसला. मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली आणि प्रवाशांना विमान प्रवासात विलंब झाला.

  • 2/12

    द्वारका फ्लायओव्हर अंडरपासच्या पुढील रस्त्यांवर मोठे पाणी साचले होते, त्यामुळे प्रवासी अडकले होते आणि गाड्या अर्ध्या पाण्यात बुडाल्या होत्या. (Image: ANI)

  • 3/12

    दिल्ली एनसीआरमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक विस्कळीत झाल्याचे दिसले. परेड रोड अंडरपास पूर्णपणे बंद करण्यात आला होता. (Image: PTI)

  • 4/12

    जोरदार वाऱ्यांमुळे झाडे उन्मळून पडली. ज्यामुळे प्रमुख रस्ते विस्कळीत झाले. राडारोडा साफ करण्यासाठी आणि रस्ते स्वच्छ करण्यासाठी बचाव पथके आणि अधिकारी रस्त्यावर उतरले. (Image: PTI)

  • 5/12

    दिल्ली कॅन्टोन्मेंट उड्डाणपुलाखाली एक संपूर्ण कार आणि एक बस पूर्णपणे बुडाली. दोन्ही वाहनांचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. (Image: ANI)

  • 6/12

    मिंटो रोडवर एक कार पूर्णपणे पाण्याखाली बुडालेली दिसत होती. कारचे मोठे नुकसान झाले होते, क्रेनदेखील कार बाहेर काढण्यास मदत करू शकली नाही. (Image: ANI)

  • 7/12

    रात्री पाऊस सुरू होण्यापूर्वी शहरातून जोरदार वारे वाहत असल्याने इंडिया गेटजवळील एका स्ट्रीटलाइटचे नुकसान झाले. (Image: PTI)

  • 8/12

    गाझियाबादसारख्या एनसीआर भागातील उद्यानात पाणी साचल्यामुळे प्रभातफेरीसाठी आलेले लोक कठड्यावरून चालताना दिसले. (Image: IANS)

  • 9/12

    नवी दिल्ली विमानतळाकडे जाणारा रस्ता तुंबला होता आणि प्रवाशांना मोठा विलंब सहन करावा लागला. आयजीआय विमानतळाने सूचना दिल्या आहेत. (Image: ANI)

  • 10/12

    आयटीओ परिसरात एकेरी वाहतूक आणि वाहनांचा वेग मंदावलेला दिसून आला. रस्ते पाण्याने तुंबले होते, रविवारच्या पावसामुळे पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले. (Image: ANI)

  • 11/12

    आयएमडीने नोंदवलेल्या पावसाळ्याच्या सुरुवातीच्या अंदाजानुसार, दिल्ली एनसीआरमध्ये अजूनही उन्हाळा आहे. वारंवार होणाऱ्या पावसामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत होत असल्याने आणि नुकसान होत असल्याने, रहिवासी येत्या पावसाळ्याच्या हंगामाची चिंता व्यक्त करत आहेत. (Image: PTI)

  • 12/12

    दिल्लीत पावसाने धुमाकूळ घातला, झाडे उन्मळून पडली, गाड्या पाण्याखाली गेल्या आणि जनजीवन अचानक ठप्प झाले. सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे पायाभूत सुविधांचे नुकसान झाले. तर रस्ते पाण्याखाली जात आहेत. यंदा पाऊस लवकर आहे का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. (Image: PTI)

TOPICS
दिल्लीDelhiमुसळधार पाऊसHeavy RainfallहवामानWeather

Web Title: In pictures delhi drowns in rain cars submerged flights diverted major traffic jams fehd import kvg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.