-
१ जुलैपासून, दिल्ली सरकार रस्त्यांवरील जुन्या वाहनांवर कारवाई करून वायू प्रदूषणाशी लढण्यासाठी सर्वात मोठ्या मोहिमांपैकी एक मोहिम सुरू करणार आहे.
-
१५ वर्षे जुन्या सीएनजी कारवरही बंदी घालण्याची योजना होती, परंतु सध्या अशा सीएनजी वाहनांच्या मालकांना दिलासा मिळाला आहे. फक्त १० वर्षे जुन्या डिझेल कार आणि १५ वर्षे जुन्या पेट्रोल कारवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.
-
दिल्लीच्या वाहतूक आयुक्त निहारिका राय यांनी सांगितले की, या जुन्या वाहनांना इंधन मिळू नये यासाठी पेट्रोल पंपांवर पथके पाठवली जातील.
-
प्रदूषण कमी करण्यासाठी या वर्षी जुन्या वाहनांवर बंदी घालणारे नियम काटेकोरपणे पाळावेत, असे सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर दिल्ली सरकारने हे पाऊल उचलले आहे.
-
यासाठी, दिल्लीतील पेट्रोल पंपांवर ऑटोमॅटिक नंबर प्लेट रीडिंग कॅमेरे बसवण्यात आले आहेत. हे कॅमेरे नंबर प्लेट स्कॅन करतील आणि जर एखादी कार मर्यादेपेक्षा जुनी असेल तर ती सिस्टमच्या लक्षात येईल. त्यानंतर पंपांवरील वाहतूक विभागाचे पथक इंधन पुरवठा थांबवतील, कार जप्त करतील आणि ती स्क्रॅपिंगसाठी पाठवतील.
-
पेट्रोल पंप मालकांना भीती आहे की इंधन थांबवल्याने पंपांवर वाद आणि समस्या उद्भवू शकतात. हे हाताळण्यासाठी, दिल्ली वाहतूक पोलिस अतिरिक्त पोलीस अधिकारी तैनात करतील. संवेदनशील मानल्या जाणाऱ्या पेट्रोल पंपांवर अधिक पोलिस पाठवले जातील, तर कमी गर्दी असलेल्या पंपांवर कमी अधिकारी तैनात केले जातील.
-
दिल्ली वाहतूक पोलिसांचे सहआयुक्त अजय चौधरी म्हणाले की, त्यांनी आधीच अशा पेट्रोल पंपांची यादी तयार केली आहे, ज्यांना २४ तास पोलीस सुरक्षेची आवश्यकता असू शकते आणि जिथे जुनी वाहने येण्याची शक्यता जास्त आहे.
-
सध्या तरी, ही कडक अंमलबजावणी फक्त दिल्लीमध्येच लागू केली जाईल. नोएडा, गाझियाबाद, गुरुग्राम, फरीदाबाद आणि सोनीपत या शेजारच्या एनसीआर शहरांमध्ये अद्याप विशेष एएनपीआर कॅमेरे बसवण्यात आलेले नाहीत.
-
परंतु अधिकाऱ्यांनी या वर्षी १ नोव्हेंबरपर्यंत या शहरांमध्येही कॅमेरे बसवण्याचा त्यांचा मानस असल्याचे सांगितले आहे. (सर्व फोटो सौजन्य पीटीआय)
‘या’ शहरात १० वर्षांपूर्वीच्या पेट्रोल-डिझेल कार्स जप्त होणार; उद्यापासून लागू होणार नवा नियम
Petrol-Diesel Car Ban: दिल्लीच्या वाहतूक आयुक्त निहारिका राय यांनी सांगितले की, या जुन्या वाहनांना इंधन मिळणार नाही याची खात्री करण्यासाठी पेट्रोल पंपांवर पथके पाठवली जातील.
Web Title: Delhi seizes old diesel petrol cars no ban on cng new rules aam