• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. maharashtra navnirman sena protest mira bhayandar shivsena ubt leaders also participated along with mns see photos spl

Photos : मीरा भाईंदरमध्ये मराठी भाषिकांचा एल्गार; मोर्चामध्ये मनसेसह ठाकरे गटाचे नेतेही सहभागी

Maharashtra Navnirman Sena Protest Rally: त्यानंतर आज (८ जुलै) मनसेच्यावतीने मीरा-भाईंदर शहरात मराठी अस्मितेसाठी मोर्चा काढण्यात येत आहे. मात्र, मनसेच्या या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती.

Updated: July 8, 2025 15:16 IST
Follow Us
  • mira bhayandar mns morcha photos
    1/12

    Mira Bhayandar MNS Morcha : ठाणे जिल्ह्यातील मिरा भाईंदर शहरात मराठी बोलण्यावरून झालेल्या वादाचे तीव्र पडसाद उमटत आहेत. या घटनेच्या निषेधार्थ काही दिवसांपूर्वीच व्यापारी संघटनांनी दुकाने बंद ठेवत मोर्चा काढून आंदोलन केलं होतं. (एक्सप्रेस फोटो – आकाश पाटील)

  • 2/12

    त्यानंतर आज (८ जुलै) मनसेच्यावतीने मीरा-भाईंदर शहरात मराठी अस्मितेसाठी मोर्चा काढण्यात येत आहे. मात्र, मनसेच्या या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. (एक्सप्रेस फोटो – आकाश पाटील)

  • 3/12

    तसेच मनसेच्या काही स्थानिक पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं यावेळी पाहायला मिळालं. (एक्सप्रेस फोटो – आकाश पाटील)

  • 4/12

    पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही मनसेचे पदाधिकारी मोर्चा काढण्यावर ठाम राहिल्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड करण्यात आली. (एक्सप्रेस फोटो – आकाश पाटील)

  • 5/12

    त्यामुळे मिरा भाईंदरमध्ये काहीसा तणाव निर्माण झाला होता. (एक्सप्रेस फोटो – आकाश पाटील)

  • 6/12

    मुख्यमंत्री म्हणाले
    मनसेच्या पदाधिकाऱ्यांना जाणीवपूर्वक मोर्चाचा मार्ग संघर्ष निर्माण होईल अशा पद्धतीने पाहिजे होता, त्यामुळे मोर्चाला पोलिसांनी परवानगी दिलेली नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं. परंतू दुपारी मोर्चाला परवानगी देण्यात आल्याची माहिती मनसे नेत्यांनी दिली. (एक्सप्रेस फोटो – आकाश पाटील)

  • 7/12

    “…..म्हणून मोर्चाला परवानगी दिली”
    प्रशासनाने, सरकारने हा मोर्चा येऊ नये यासाठी प्रयत्न केला. पोलिसी बळाचा वापर केला. दडपशाही केली. तरीही मराठी माणूस वाकला नाही हे पाहून ते झुकले. मोर्चाला परवानगी दिली गेली. एखादा आमदार मेहता आहे म्हणून काय फक्त मेहता लोकांचाच आहे की काय? सामान्य लोकांचा नाहीये का? एखादा व्यापारी उठून म्हणतो की महाराष्ट्रात हिंदीच बोलणार, त्याला आमच्या लोकांनी प्रसाद दिला. व्यापाऱ्यांच्या मोर्चाला पोलीस संरक्षण देऊन परवानगी दिली जाते. पण मराठी माणसाच्या मोर्चाला परवानगी नाकारली जाते? हा मराठी माणूस तुम्हाला घरी बसवल्याशिवाय राहणार नाही. ते घाबरले म्हणून मोर्चाला परवानगी दिली – अभिजीत पानसे, मनसे नेते (एक्सप्रेस फोटो – आकाश पाटील)

  • 8/12

    मनसेसह ठाकरे गटाचे नेतेही मीरारोड मोर्चाच्या ठिकाणी दाखल
    संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई, राजन विचारे, विनोद घोसाळकर मीरारोड मोर्चाच्या ठिकाणी दाखल झाले आहेत. (एक्सप्रेस फोटो – आकाश पाटील)

  • 9/12

    त्यामुळे या मोर्चाला मनसेसह ठाकरे गटाचाही पाठिंबा असल्याचं यातून स्पष्ट होत आहे. (एक्सप्रेस फोटो – आकाश पाटील)

  • 10/12

    मिरा भाईंदरमधील तणावामुळे व्यापाऱ्यांची दुकाने बंद
    मराठी भाषिक आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेण्यास सुरुवात केल्यानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. या पार्श्वभूमीवर, घटनास्थळी उपस्थित असलेल्या हिंदी भाषिक दुकानदारांनी आपली दुकाने बंद केल्याचे दिसून आले. (एक्सप्रेस फोटो – आकाश पाटील)

  • 11/12

    प्रताप सरनाईकांचा काढता पाय
    राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मराठी अस्मितेसाठी सुरू असलेल्या मोर्चाला भेट दिली. मात्र सरनाईक येताच आंदोलकांनी त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.पन्नास खोके एकदम ओके, गद्दार तुम्ही परत जा अशा घोषणा देत गोंधळ घातला. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी सरनाईकांना त्या ठिकाणाहून तातडीने बाजूला नेण्यात आले. (एक्सप्रेस फोटो – आकाश पाटील)

  • 12/12

    हेही पाहा- कोण आहे राजश्री मोरे? मनसे पदाधिकाऱ्याच्या मुलाचा अर्धनग्न व्हिडिओ शेअर केल्यानं आली आहे चर्चेत…

TOPICS
मनसेMNSमराठीMarathiमराठी बातम्याMarathi Newsमोर्चाMorchaशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)Shivsena UBT

Web Title: Maharashtra navnirman sena protest mira bhayandar shivsena ubt leaders also participated along with mns see photos spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.