-
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात होती. यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाची मुंबईत एक महत्वाची बैठक पार पडली.
-
या बैठकीत अखेर आमदार शशिकांत शिंदे यांची नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.
-
माथाडी कामगारांच्या लढ्यासाठी परिचित असलेले शशिकांत शिंदे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झालेले आहे.
-
१९९९ साली ते पहिल्यांदा आमदार झाले. जावळीतून आमदार झालेले शिंदे हे पुढे मंत्रीही झाले. त्यांनी जलसंपदामंत्री म्हणून काम केले.
-
सातारा जिल्ह्यातील कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून २००९ आणि २०१४ या काळात १० वर्ष आमदार.
-
शिकांत शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधानसभेतील पक्षप्रतोद आहेत.
-
राज्य माथाडी कामगार ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे अध्यक्ष आहेत.
-
शशिकांत शिंदेंनी सातारा जिल्हाध्यक्ष म्हणून, जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम पक्षाचा जनता दरबार घेण्यास सुरुवात केली.
-
(सर्व फोटो साभार- शशिकांत शिंदे/फेसबुक) हेही पाहा- समोसा, जिलेबी हे पदार्थ ‘या’ मुस्लिम देशांतून भारतात आले; यांच्याबाबत तंबाखू विरोधासारखे फलक लागणार
भाकरी फिरली! शशिकांत शिंदे ‘राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षा’चे नवे प्रदेशाध्यक्ष; कसा होता त्यांचा आजवरचा प्रवास?
शशिकांत शिंदे यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.
Web Title: Who is shashikant shinde new president of sharad pawar s nationlist party jayant patil politics spl