-
अभिनेता किंग काँगनं वादिवेलु आणि विवेक यांच्यासोबत अनेक विनोदी चित्रपटांमध्ये काम करून प्रेक्षकांचे लक्ष वेधले. त्यांच्या अभिनयामुळे ते घराघरात ओळखले जाऊ लागले. त्यांच्या पत्नीचे नाव काला असून, त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे.
सध्या त्यांची मोठी मुलगी कीर्तनाचे लग्न पार पडले असून, या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी अनेक राजकीय आणि चित्रपटसृष्टीतील कलाकारांना आमंत्रित केले होते. -
लग्नाच्या रिसेप्शनला चित्रपटसृष्टी आणि राजकीय नेत्यांनी हजेरी लावली आणि वधू-वरांना शुभेच्छा दिल्या, तर कीर्तन-नवीनच्या लग्नाचे फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. किंग काँगच्या मुलीच्या लग्नाची बातमी गेल्या एक महिन्यापासून सोशल मीडियावर चर्चेत होती. कारण किंग काँगने चित्रपटातील कलाकारांपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत सर्वांना वैयक्तिकरित्या भेटून आमंत्रित केले होते.
-
किंग काँग यांनी त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन, विरोधी पक्षनेते एडाप्पाडी पलानीसामी, तसेच अभिनेते शिवकार्तिकेयन, विशाल, कार्ती, विजय सेतुपती, योगी बाबू, चार्ली आणि इतर कलाकारांना आमंत्रित केले होते.
या भेटीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि चाहत्यांचे विशेष लक्ष वेधून घेतले. -
१० जुलै रोजी सकाळी कीर्तना आणि नवीनचे लग्न पार पडले आणि संध्याकाळी रिसेप्शन आयोजित करण्यात आले.
तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी स्वतः जाऊन नवविवाहित जोडप्याचे अभिनंदन केले.
अण्णाद्रमुककडून माजी मंत्री जयकुमार यांनीही उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या आणि आनंदात किंग काँगला उचलून घेतले. नेते तिरुमावलवनही या सोहळ्यास हजर होते. -
चित्रपटसृष्टीतील विशाल, नास्सर, चार्ली, रोबो शंकर व ऐसारी गणेश यांसारखे कलाकार किंग काँगच्या मुलीच्या रिसेप्शनला हजर होते आणि त्यांनी नवविवाहित जोडप्याचे अभिनंदन केले.
इतर काही कलाकार उपस्थित नव्हते. तरीही कीर्तना आणि नवीनचे लग्न आणि रिसेप्शन मोठ्या थाटात पार पडले. -
लग्नाला प्रत्यक्ष येऊ न शकल्याने अभिनेता वादिवेलु यांनी किंग काँगशी फोनवर बोलून शुभेच्छा दिल्या.
अलीकडच्या एका मुलाखतीत किंग काँग म्हणाले की, वादिवेलु कुटुंबासोबत कुलदेवतेच्या मंदिरात गेले होते आणि प्रभू देवासोबत एका चित्रपटावर चर्चा करण्यात व्यग्र होते. त्यामुळे ते स्वतः येऊ शकले नाहीत.
Photos: किंग काँगच्या मुलीच्या लग्नात सेलिब्रिटींचा जल्लोष; फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
तमीळ अभिनेता ‘किंग काँग’ (खऱ्या नावानं शंकर एझुमलाई) यांची मुलगी कीर्तना हिचे लग्न थाटात पार पडले. किंग काँगनं दिलेले खास आमंत्रण सोशल मीडियावर झळकले.
Web Title: Celebrities grace king kongs daughters wedding photos and videos go viral ama06