-
चीनमधील तियानजिन शहरात शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) परिषदेच्या दुसऱ्या दिवशी पूर्ण सत्र आयोजित केले जात आहे.
-
एससीओ राष्ट्रप्रमुखांच्या २५ व्या बैठकीनंतर एक संयुक्त घोषणापत्र जारी केले जाईल. असे मानले जाते की या सत्रात पंतप्रधान मोदी दहशतवादाविरुद्ध भारताची कठोर भूमिकेचा पुनरुच्चार करू शकतात.
-
या शिखर परिषदेसाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिनही उपस्थित आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी गळाभेट घेतल्याचे पाहायला मिळाले.
-
दरम्यान, पंतप्रधान मोदी आणि पुतिन यांच्या या गळाभेटीचे फोट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
-
दरम्यान एससीओ शिखर परिषदेचे अनेक फोटो समोर आले आहेत, त्या फोटोंमध्ये मोदी, पुतिन आणि जिनपिंग एकत्र दिसत आहेत. यानंतर या फोटोंमधून मोठे अर्थ काढले जाऊ लागले आहेत.
-
दरम्यान पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या तियानजिनमध्ये द्विपक्षीय बैठक होणार आहे. ही बैठक सकाळी ९:४५ वाजता सुरू होणार असून, ती ४५ मिनिटे चालेल.
-
पंतप्रधान मोदी आणि पुतिन यांच्यात परस्पर संबंध, व्यवसाय आणि युक्रेन युद्ध यावर चर्चा होऊ शकते. संपूर्ण जगाचे लक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यातील द्विपक्षीय चर्चेवर आहे.
-
दोन्ही नेत्यांमधील चर्चेच्या केंद्रस्थानी अमेरिकन टॅरिफचा मुद्दा देखील असू शकतो. कारण भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्यामुळे ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लादले आहे.
-
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी पंतप्रधान मोदींच्या चीन दौऱ्यापूर्वी त्यांच्याशी फोनवर चर्चा केली होती. त्या संभाषणात झेलेन्स्की यांनी तात्काळ युद्धबंदीचे आवाहन केले होते. अशा परिस्थितीत, पुतिन यांच्यासोबतच्या बैठकीत, पंतप्रधान मोदी या समस्येवर राजनैतिक तोडगा काढावा आणि शांतता चर्चा सुरू करावी असा आग्रह धरू शकतात असे मानले जाते. (सर्व फोटो सौजन्य: पंतप्रधान कार्यालय)
हस्तांदोलन, गळाभेट आणि… डोनाल्ड ट्रम्प यांची चिंता वाढवणारे पंतप्रधान मोदी आणि पुतिन यांचे फोटो व्हायरल
Modi-Putin: दरम्यान, पंतप्रधान मोदी आणि पुतिन यांच्या या गळाभेटीचे फोट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Web Title: Pm modi meets putin and xi before sco summit plenary address sco 2025 photos aam