-

मराठा आरक्षणासाठी सुरु असलेले मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन सध्या राज्यातील सर्वात मोठी घडामोड ठरत आहे. (फोटो-संग्रहित छायाचित्र)
-
जरांगे पाटलांच्या मुंबईतील आमरण उपोषण आंदोलनाचा आज पाचवा दिवस आहे. त्यांचं हे उपोषण आजाद मैदानावर सुरू आहे. या आंदोलनासाठी राज्यातून अनेक मराठा बांधवांनी हजेरी लावली आहे. (फोटो-संग्रहित छायाचित्र)
-
काल मराठा समाजाच्या मुंबईतील याच आंदोलनाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने महत्वपूर्ण सुनावणीत काही निर्देश दिले आहेत. ज्यावरुन आज मनोज जरांगे पाटलांनी त्यांची भूमिका मांडली आहे. (फोटो-संग्रहित छायाचित्र)
-
जीआर
मराठा – कुणबी एकच या जीआरशिवाय मुंबई सोडणार नाही असं मनोज जरांगे पाटलांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे. (फोटो-संग्रहित छायाचित्र) -
न्यायदेवता न्याय देईल
न्यायदेवता आमच्या बाजूने न्याय देईन. सध्या मुंबईत कुठेही वाहनांची कोंडी नाही. न्यायालयाचे आदेश येताच आम्ही वाहनं हटवली, असं जरांगेंनी म्हटलं आहे. (फोटो-संग्रहित छायाचित्र) -
मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा
आम्ही शांत आहोत आम्हाला शांत राहूद्या. शनिवार- रविवार मराठे जर मुंबईत आले तर मुंबईतले हे आंदोलन खूप छान असेल. ही वेळ मराठ्यांवर येऊ देऊ नका. शंभर पोलीस आले किंवा लाखो आले तरी जेलमध्येच नेणार. आम्ही मुंबई सोडणार नाही. (फोटो-संग्रहित छायाचित्र) -
समाजावर अन्याय होईल असे वागू नका. हैदराबाद गॅझेटशिवाय मुंबई सोडणार नाही. तुम्हाला वाटतं असेल तुमच्यापेक्षा आमची संख्या साडेनऊ पटीने जास्त आहे. नको तिकडे घुसू नका (फोटो-संग्रहित छायाचित्र)
-
आझाद मैदानातून हटवण्याच्या वल्गना करू नका
गोरगरीब मराठ्यांना न्याय द्या. मेलो तरी आझाद मैदानातून हटत नाही. त्याचे परिणाम तुम्ही आणि मराठे जाणो. मागण्यांची अंमलबजावणी झाल्याशिवाय जाणार नाही. मराठे काय असतात हे ३५० वर्षांनंतर बघायचे असेल तर माझा नाईलाज आहे. असा घणाघात जरांगे पाटलांनी केला आहे. (फोटो-संग्रहित छायाचित्र)
‘या’ जीआर शिवाय मनोज जरांगे पाटलांचा मुंबई सोडण्यास नकार, म्हणाले “आझाद मैदानातून…”
काल मराठा समाजाच्या मुंबईतील याच आंदोलनाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने महत्वपूर्ण सुनावणीत काही निर्देश दिले आहेत. ज्यावरुन आज मनोज जरांगे पाटलांनी त्यांची भूमिका मांडली आहे.
Web Title: Manoj jarange patil azad maidan hunger strike mumbai day 5 pc demand this gr maratha reservation spl