-
दादरमधील शिवाजी पार्क मैदानावरील माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर आज (१७ सप्टेंबर) सकाळी अज्ञात इसमाने लाल रंग फेकल्याने तणाव निर्माण झाला आहे. शिवसेना आणि मनसेचे कार्यकर्ते यांनी घटनास्थळी धाव घेत निषेध व्यक्त केला.
-
दादरच्या शिवाजी पार्क मैदानाच्या प्रवेशद्वारावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी मीनाताई ठाकरे यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. मीनाताई ठाकरे यांना शिवसैनिकांमध्ये त्यांच्याबद्दल अत्यंत आदराचे स्थान आहे. शिवाजी पार्कला येणारे शिवसैनिक माँसाहेबांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होतात.
-
या पुतळ्यावर बुधवारी सकाळी कुणी तरी लाल रंग टाकलयाचे आढळले. ही बातमी पसरतात संतप्त शिवसैनिकांनी शिवाजी पार्क मैदानात गर्दी केली. यामुळे मोठा तणाव निर्माण झाला होता. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन या परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
-
मनसेचे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथे धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला आणि कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले.
-
“आज घडलेला प्रकार अत्यंत निंदनीय आहे. यामागे अशी व्यक्ती असू शकते ज्याला स्वतःच्या आई वडिलांचे नाव घ्यायला शरम वाटते. कुणीतरी अनौरस माणसाने हे केलं असेल”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
-
कोण होत्या मीनाताई ठाकरे?
मीनाताई ठाकरे या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी होत्या. १३ जून १९४८ साली त्यांचा विवाह झाला होता. -
मीनाताई ठाकरे यांचा जन्म ६ जानेवारी १९३२ साली झाला होता. लग्नापूर्वी माहेरचे नाव सरला वैद्य असे होते. ६ सप्टेंबर १९९५ रोजी त्यांचा मृत्यू झाला. शिवसैनिक त्यांचा जन्मदिन ममता दिन म्हणून साजरा करतात.
-
बाळासाहेब ठाकरे यांनी जेव्हा शिवसेना स्थापन केली, तेव्हा त्यांच्या संघर्षाच्या काळात मीनाताई ठाकरे यांनी कुटुंबाला एकत्र ठेवले आणि अतिशय कठीण काळात बाळासाहेब ठाकरे यांना भक्कम साथ दिली.
-
मीनाताई ठाकरे या राज ठाकरेंच्या मावशी आणि काकी दोन्ही होत्या. त्यामुळे त्यांचाही मीनाताई ठाकरेंशी भावनिक संबंध होता. राज ठाकरे मीनाताईंना माँसाहेब म्हणायचे. पुढे शिवसैनिकांनीही त्यांना माँसाहेब अशीच हाक मारली.
Who is Meenatai Thackeray: मीनाताई ठाकरे कोण आहेत? त्यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर दोन्ही शिवसेना, मनसेमध्ये संतापाचे वातावरण का?
Who is Meenatai Thackeray: मुंबईतील दादर येथे असलेल्या शिवाजी पार्कजवळ असलेले दिवंगत मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना केल्यानंतर राजकारण तापले आहे. यानिमित्ताने मीनाताई ठाकरे कोण आहेत? हे जाणून घेऊ.
Web Title: Who is meenatai thackeray came into the spotlight after red paint on her statue know wife of balasaheb thackeray information kvg