-
उद्धव ठाकरेंनी ठाण्यात भाषण केलं. या भाषणात त्यांनी एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. (सर्व फोटो सौजन्य-उद्धव ठाकरे एक्स पेज)
-
शिवसेनेचे ठाण्यातील नेते अनंत तरे यांच्यावरील पुस्तकाचं प्रकाशन उद्धव ठाकरेंच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी त्यांना खास सत्कारही करण्यात आला.
-
उद्धव ठाकरे म्हणाले मला अनंत तरेंची आठवण येते आहे. मला वहिनी म्हणाल्या की ते असते तर त्यांना किती आनंद झाला असता. मी म्हटलं ते असते तर आपल्याला किती आनंद झाला असता.
-
यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले काहीवेळा प्रामाणिकपणे अनेकजण गोष्टी सांगत असतात. पण निष्ठेचे मुखवटे घालून बसलेली माणसं आपल्या आजबाजूला इतका वेढा घालून बसतात की नाही म्हटलं तरीही आपल्या लोकांकडे दुर्लक्ष होतं.
-
मला नाही म्हटलं तरी पश्चात्ताप होतो आहे. तेव्हाच मी अनंत तरेंचं ऐकलं असतं तर आत्ता जरा कुठे गळ्याशी येतं म्हटल्यावर अमित शाह यांच्या चरणी लोटांगण घालून वाचवा वाचवा म्हणत हंबरडा फोडत बसणारी माणसं दिसली नसती.
-
२०१४ ला अनंत तरे उभे राहणार होते. अचानक भाजपाने युती तोडली त्यावेळी विधानसभेला. त्यावेळीच शिवसेना संपवण्याचा डाव होता. आपण लढलो, उमेदवार उभे केले. तेव्हा अनंत तरेंनी अपक्ष अर्ज भरला होता. मला सगळ्यांनी सांगितलं की तरे ऐकत नाहीत.
-
लोटांगणवीर आले मला म्हणाले काहीही करा नाहीतर सीट जाणार, मग मी तरेंना मी समजावून सांगितलं. आपण भाजपाचं संकट दूर करु, ते आपल्याला संपवायला निघाले आहेत त्यानंतर मानपान पाहू. तेव्हा मला अनंत तरे यांनी मला सांगितलं होतं की हाच उद्या आपल्याला दगा दिल्याशिवाय राहणार नाही. असं उद्धव ठाकरे म्हणाले.
-
अनंत तरे यांनी जे सांगितलं होतं ते घडलं. अनंत तरे नावाचा राजहंस आपल्यात असता तर हे कावळे फडफडले नसते. असाही टोला उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता लगावला.
-
गद्दारांना क्षमा नाही, गद्दारी केली गेली त्याच ठाण्यात नगरसेवकांचे राजीनामे शिवसेनाप्रमुखांनी घेतली होती. त्या आठवणींची पुस्तकं पानं मला चाळायची आहेत. अनंत तरे यांनी खूप महत्त्वाचं काम केलं होतं. आनंद दिघे, वसंतराव मराठे, मो.दा. जोशी, प्रकाश परांजपे ही सगळी माणसं आपल्या सोबतीला असती तर कुणाची हिंमत होती गद्दारीतला ग उच्चारण्याची? असा सवालल उद्धव ठाकरेंनी केला.
-
दरम्यान एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेला उत्तर दिलं आहे. घराचा उंबरठा न ओलांडणारे लोक आता हंबरडा मोर्चा काढत आहेत. सत्ता गेली तेव्हा हंबरडा फोडला, खुर्ची गेली तेव्हा हंबरडा फोडला. आता हंबरडा मोर्चा काढत आहेत.
-
मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही मला घटनाबाह्य म्हणत होते, आताही म्हणत आहेत. अडीच वर्षात रोज सांगत होते, आज पद जाणार उद्या जाणार पण काही घडलं नाही असंही एकनाथ शिंदे म्हणाले.
-
उद्धव ठाकरे सत्तेसाठी एमआयएमच नाही पाकिस्तानचाही पाठिंबा घेतील. निवडणूक जिंकण्यासाठी ते काहीही करु शकतात. असंही उद्धव ठाकरेंबाबत शिंदेंनी म्हटलं आहे.
“..तर ठाण्यात गद्दारीचा ‘ग’ उच्चारण्याची कुणाची हिंमत झाली नसती”; उद्धव ठाकरे असं का म्हणाले?
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाण्यातल्या भाषणात एकनाथ शिंदेंचं नाव न घेता जोरदार टीका केली.
Web Title: Uddhav thackeray speech in thane he slams eknath shinde without taking his name and also said this things about anant tare scj