-

मतचोरीच्या आरोपांविरोधात महाविकास आघाडी आणि मनसेचा मोर्चा निघाला होता. या मोर्चात शेकाप, डावे पक्षही सहभागी झाले होते. (सर्व फोटो सौजन्य-गणेश शिर्सेकर, इंडियन एक्स्प्रेस)
-
फॅशन स्ट्रीट ते मुंबई महापालिका मुख्यालय असा हा मोर्चा निघाला होता.
-
सत्याचा मोर्चा मुंबईत निघाला होता. या मोर्चात गर्दी पाहण्यास मिळाली.
-
विविध बॅनर घेऊन आणि फलक हातात घेऊन मोर्चात विविध पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
-
कल्याण, डोंबिवली, भिवंडी, पालघर इथल्या साडेचार हजार मतदारांनी मलबार हिलमध्येही मतदान केलं आहे. माझ्याकडे साडेचार हजार नावं आहेत. त्यांनी त्या मतदार संघात मतदान केलं आहे आणि मलबार हिल या ठिकाणीही मतदान केलं आहे असा आरोप राज ठाकरेंनी केला.
-
अॅनाकोंडाला आपल्याला आता कोंडावंच लागेल. नाहीतर हे लोक सुधारणार नाहीत. रोज कुठून तरी पुरावे येत आहेत. तरीही राज्यकर्ते आणि निवडणूक आयोग गप्प बसले. आपला पक्ष चोरला, नाव चोरलं, निशाणी चोरली माझे वडील चोरी करायचा प्रयत्न झाला आणि ते पण पुरलं नाही म्हणून आता मतचोरी करत आहेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
-
सत्याचा मोर्चा होता त्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याचंही पाहण्यास मिळालं.
-
या मोर्चामध्ये महायुती सरकारचा निषेध नोंदवण्यात आला आणि निवडणूक आयोगावरही जोरदार टीका झाली.
राज आणि उद्धव ठाकरेंची आक्रमक भाषणं, शरद पवारांचं महत्त्वाचं आवाहन; ‘सत्याचा मोर्चा’त काय घडलं?
महाविकास आघाडी आणि मनसेचा सत्याचा मोर्चा, राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांची आक्रमक भाषणं.
Web Title: Satyacha morcha in mumbai what uddhav thackeray and raj thackeray said what is sharad pawar appeal know about it scj