• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • मराठवाडा
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. ajit pawar says something fishy in government formation of eknath shinde devendra fadnavis gives reference of amruta fadanvis comment scsg

Photos: ‘फडणवीसांच्या पत्नीनेच…’, ‘कागद लिहून…’, ‘गुजरात, गुवाहाटी, गोव्यात…’, ‘फोडाफोडी करून जे..’; पवारांची फटकेबाजी

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यातील सत्ता नाट्यामधील अनेक गोष्टींचा उल्लेख करत शिंदे आणि फडणवीसांना लक्ष्य केलं

Updated: July 16, 2022 20:49 IST
Follow Us
  • Ajit Pawar Says something fishy in government formation of eknath shinde Devendra fadnavis gives reference of Amruta Fadanvis comment
    1/22

    “राज्यात सत्तांतर होण्यापूर्वी जो घटनाक्रम झाल्याचे दिसून येते, ते सर्व पाहता कुठंतरी पाणी मुरतंय आणि नक्कीच काहीतरी गडबड झाली आहे, हे त्रिवार सत्य आहे,” अशी सूचक टिप्पणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी खेड येथे बोलताना केली.

  • 2/22

    कुठंतरी पाणी मुरते आहे, हे सांगताना पवार म्हणाले की, “१५ दिवसांत शिवसेना आमदारांनी त्यांची भूमिका बदलली. ते रडीचा डाव खेळले.”

  • 3/22

    कुठंतरी पाणी मुरते आहे, हे सांगताना पवार म्हणाले की, “१५ दिवसांत शिवसेना आमदारांनी त्यांची भूमिका बदलली. ते रडीचा डाव खेळले.”

  • 4/22

    “आताच मुख्यमंत्र्यांचा माईक ओढला जातो. कागद लिहून काय बोलायचे ते त्यांना सांगितले जाते. ही तर सुरूवात आहे,” असा इशारा अजित पवारांनी दिला.

  • 5/22

    “नव्याचे नऊ दिवस अजून संपायचे आहेत. पुढे मुख्यमंत्र्यांना बरेच काही पहावे लागणार आहे,” असा टोलाही अजित पवारांनी लगावला.

  • 6/22

    “पक्षांतर केलेले नेते जनतेला आवडत नाही. पुढच्या वेळी मतदार त्यांना नाकारतात, हे यापूर्वी अनेकदा दिसून आलेले आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावे.” असंही अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना उद्देशून म्हटलं.

  • 7/22

    पवार म्हणाले, “सध्या राज्यात काहीही चाललेले आहे. आपण लोकशाही मानणारे आहोत. मात्र, राज्यात सध्या लोकशाहीची थट्टा सुरू आहे. लोकशाहीचा खून केला जात आहे.”

  • 8/22

    “पक्षांतर बंदी कायद्याला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या आहेत. असे यापूर्वी महाराष्ट्रात आणि देशातही घडले नव्हते,” असंही अजित पवार यांनी म्हटलं.

  • 9/22

    “सत्ता येत असते, जात असते. सत्तेचा ताम्रपट घेऊन कोणी आलेला नाही. जनता काय तो निर्णय घेत असते,” असा इशाराही त्यांनी दिला.

  • 10/22

    “ज्या पध्दतीने उध्दव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरून घालवले. राष्ट्रवादी काँग्रेसला बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला. हे राजकारण फार काळ टिकणारे नाही,” असा दावाही अजित पवार यांनी केला.

  • 11/22

    “सर्व घडामोडींकडे मतदारांचे लक्ष असते. मतदानाच्या दिवशी ते योग्य निर्णय घेत असतात,” असंही ते म्हणाले.

  • 12/22

    “कालपर्यंत आम्ही सत्तेत होतो. आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. मात्र, त्यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार का होत नाही? याचे उत्तर त्यांनाच माहिती आहे,” असं मंत्रिमंडळाच्या विस्ताराला होत असणाऱ्या विलंबावरुन नाराजी व्यक्त करताना अजित पवार म्हणाले.

  • 13/22

    “मंत्री, पालकमंत्री नेमले असते तर सध्याच्या संकटाच्या काळात त्यांनी आपआपल्या भागाचा आढावा घेतला असता,” असंही अजित पवारांनी शिंदे सरकारवर टीका करताना म्हटलं.

  • 14/22

    “जिल्हाधिकारी, मुख्याधिकाऱ्यांना सूचना देऊन आवश्यक कार्यवाही झाली असती,” असंही अजित पवार म्हणाले.

  • 15/22

    “राज्यात ३६ जिल्हे आहेत. त्या सर्व ठिकाणी काम सुरू झाले असते. मात्र, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री दोघेच मालक झाले आहेत,” असा टोला अजित पवारांनी लागवला.

  • 16/22

    “मंत्रीमंडळाचा विस्तार करून बाकीच्या आमदारांना का सामावून घेतले जात नाहीत? मंत्रीमंडळात आणखी ४० जण घेता येऊ शकतात. मात्र, त्यांची वर्णी लागताना दिसत नाही,” याकडे देखील अजित पवारांनी लक्ष वेधले.

  • 17/22

    सत्तांतरण नाट्यावर भाष्य करताना, “सुरूवातीला म्हणाले आमचा दुरान्वये संबंध नाही. काय चालले आहे, हे आम्हालाच माहिती नाही. नंतर हे सगळे सूरतला पोचले,” असं अजित पवार म्हणाले.

  • 18/22

    “सुरतला त्यांना कडेकोट बंदोबस्त कसा मिळाला? गुजरात सरकारने संरक्षण देऊन त्यांची बडदास्त का ठेवली?,” असा प्रश्न अजित पवार यांनी विचारला.

  • 19/22

    “नंतर ते गुवाहाटीला कशाप्रकारे गेले? तेथे त्यांना कसा बंदोबस्त मिळाला? तिथून ते गोव्याला गेले,” असं अजित पवार म्हणाले.

  • 20/22

    “गोव्यातही त्यांना बंदोबस्त मिळाला. या तीनही ठिकाणी कोणाची सरकारे होती?,” असं प्रश्न विचारत अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे भाजपावर निशाणा साधला.

  • 21/22

    “एकीकडे ते फोडाफोडी करत होते, तर दुसरीकडे आमचा काही संबंध नसल्याचा दावा करत होते. अशातच देवेंद्र फडणवीस वेष बदलून घराबाहेर जायचे, हे त्यांच्या पत्नीनेच उघड केले,” असं म्हणत अजित पवार यांनी अमृता फडणवीस यांनी केलेल्या खुलाश्याचाही संदर्भ दिला.

  • 22/22

    “फोडाफोडी करून जे मिळवले आहे, ते औट घटकेचे आहे, हे लवकरच मुख्यमंत्र्यांना कळेल”, असेही अजित पवार म्हणाले.

TOPICS
अजित पवारAjit Pawarएकनाथ शिंदेEknath Shindeदेवेंद्र फडणवीसDevendra Fadnavis

Web Title: Ajit pawar says something fishy in government formation of eknath shinde devendra fadnavis gives reference of amruta fadanvis comment scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.