• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. cm eknath shinde dasara melava speech upset on uddhav thackeray for mentioning grandson name scsg

Photos: भाषणादरम्यान चिठ्ठी आली अन्… नातवाबद्दल उद्धव ठाकरेंचं ‘ते’ विधान पाहून CM शिंदे संतापून म्हणाले, “तुमचा मुलगा…”

मुख्यमंत्री शिंदेंच्या हातात ही चिठ्ठी पडताच त्यांनी त्यांच्या भाषणातील अनेक मुद्दे नियोजित मुद्द्यांबरोबर उस्फुर्तपणे या टीकेवरही प्रतिक्रिया दिली.

October 6, 2022 19:16 IST
Follow Us
  • CM Eknath Shinde Dasara Melava Speech upset on Uddhav Thackeray for mentioning Grandson name
    1/18

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यातील भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबियांवर केलेल्या टीकेमुळे येत्या काळात दोन्ही नेत्यांमधील वितुष्ट टोकाला जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

  • 2/18

    एकनाथ शिंदे बीकेसीमधील दसरा मेळाव्यात भाषणासाठी उभे राहिले असता, त्यांना उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेची माहिती चिठ्ठीच्या माध्यमातून दिली जात होती.

  • 3/18

    यावेळी उद्धव ठाकरेंनी मुलगा आणि नातवावर टीका केल्याचं समजताच त्यांचा संताप अनावर झाल्याचं समजत आहे.

  • 4/18

    उद्धव ठाकरे यांच्या भाषणानंतर एकनाथ शिंदे यांचं भाषण होईल अशी रणनीती आखण्यात आली होती.

  • 5/18

    उद्धव ठाकरेंचं भाषण अंतिम टप्प्यात येताच एकनाथ शिंदे यांच्या भाषणाला सुरुवात झाली.

  • 6/18

    याचदरम्यान उद्धव ठाकरेंनी केलेल्या भाषणाची काही टिप्पणी एकनाथ शिंदे यांच्याकडे येत होती.

  • 7/18

    उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबावर शेलक्या शब्दात प्रहार केले.

  • 8/18

    बाप मुख्यमंत्री, कारटं खासदार आणि नातू आता नगरसेवक पदावर डोळे लावून बसला आहे. त्याला मोठं तर होऊ द्या असा उल्लेख उद्धव यांनी आपल्या भाषणात केला.

  • 9/18

    उद्धव ठाकरेंनी मुलगा श्रीकांत आणि नातू रुद्रांक्ष यांचा उल्लेख केल्याची चिठ्ठी एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचली आणि त्यांचा संताप अनावर झाल्याचे त्याच्या विश्वसनीय समर्थकांनी सांगितलं.

  • 10/18

    एकनाथ शिंदे यांच्या भाषणातील अनेक मुद्दे नियोजित होते.

  • मात्र त्यांच्या मुलाच्या आणि विशेषतः नातवाच्या उल्लेखामुळे ते व्यथित झाल्याचे त्याच्या निकटवर्तीयांनी सांगितले.
  • 11/18

    शिवसेनेतील बंडानंतरही एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर व्यक्तिगत टीका करणं टाळलं होतं.

  • 12/18

    असं असताना कुटुंबियांवर झालेल्या टीकेमुळे एकनाथ शिंदे यांनी ठाकरे यांच्या कार्यपद्धतीचा उल्लेख ‘ हम दो हमारे दो ‘ असा केल्याचं सांगण्यात येतं.

  • 13/18

    “माझा नातू दीड वर्षाचा आहे. त्याचा जन्म झाल्यानंतर तुमचं अध:पतन सुरू झालं,” असं एकनाथ शिंदे म्हणाले.

  • 14/18

    “कुणावर टीका करताय त्या दीड वर्षाच्या बाळावर. कोणत्या पातळीवर पोहोचला आहात?” असा संतप्त सवाल शिंदे यांनी भाषणात विचारला.

  • 15/18

    “पायाखालची वाळू सरकली ना. तुम्ही मुख्यमंत्री झाले, तुमचा मुलगा मंत्री झाला. आम्ही काही बोललो का?” असंही शिंदे म्हणाले.

  • 16/18

    “लाज तुम्हाला वाटायला हवी होती. बाळासाहेबांच्या विचारांना तोडून मोडून तुम्ही सत्ता मिळवली,” असा टोला शिंदेंनी लगावला.

  • 17/18

    “छातीवर दगड ठेवून मी तुमच्यासोबत राहिलो. मुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायला तुम्हाला लाज वाटली पाहिजे होती,” असं प्रत्युत्तर एकनाथ शिंदे यांनी दिलं.

TOPICS
उद्धव ठाकरेUddhav Thackerayएकनाथ शिंदेEknath Shindeदसरा मेळावाDasara Melava

Web Title: Cm eknath shinde dasara melava speech upset on uddhav thackeray for mentioning grandson name scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.