• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पार्थ पवार
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. priyanka chopra nimrat kaur aishwarya rai irrfan khan indian actors who have worked in hollywood

हॉलिवूडमध्ये चमकलेले भारतीय कलाकार

Updated: October 6, 2021 17:37 IST
Follow Us
  • अभिनेत्री प्रियांका चोप्राने अमेरिकास्थित एबीसी नेटवर्क या कंपनीशी एक वर्षाचा करार केला असून त्यासाठी ती पुढील सहा महिने अमेरिकेतच राहणार आहे. याशिवाय, 'क्वँटिको' या अमेरिकन नाटकात प्रियांका एफबीआय एंजट असणाऱ्या अॅलेक्सची भूमिका साकारणार आहे.
    1/13

    अभिनेत्री प्रियांका चोप्राने अमेरिकास्थित एबीसी नेटवर्क या कंपनीशी एक वर्षाचा करार केला असून त्यासाठी ती पुढील सहा महिने अमेरिकेतच राहणार आहे. याशिवाय, ‘क्वँटिको’ या अमेरिकन नाटकात प्रियांका एफबीआय एंजट असणाऱ्या अॅलेक्सची भूमिका साकारणार आहे.

  • 2/13

    बॉलीवूडमधील यशस्वी कारकीर्दीनंतर ऐश्वर्या राय आता हॉलिवूडच्या ‘पिंक पँथर-२’ आणि ‘द लास्ट लेगिऑन’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

  • 3/13

    ‘द लंचबॉक्स’ या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीला स्वत:ची दखल घ्यायला लावणारी निम्रत कौर येत्या काही दिवसांमध्ये ‘होमलँड’ या टेलिव्हिजन मालिकेत काम करणार आहे. यामध्ये ती एका आयएसआय एजंटची भूमिका साकारत आहे.

  • 4/13

    मल्लिका शेरावत हिची बॉलीवूडमधील कारकीर्द यथातथाच असली तरी हॉलिवूडमध्ये ‘द मिथ’, ‘पॉलिटिक्स ऑफ लव्ह’ आणि ‘हिस’ सारखे चित्रपट तिच्या नावावर जमा आहेत.

  • 5/13

    बॉलीवूडमध्ये आपल्या वेगळ्या अभिनयशैलीचा ठसा उमटवणारा इरफान खान आतापर्यंत ‘द नेमसेक’, ‘लाईफ ऑफ पाय’, ‘अ माईटी हर्ट’, ‘आय लव्ह यु’, ‘द स्लमडॉग मिलेनिअर’, ‘द अमेझिंग स्पायडरमॅन’ या हॉलिवूडपटांमध्ये दिसला होता.

  • 6/13

    बॉलीवूडमध्ये उत्तम अभिनेता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नसरुद्दीन शहा यांनी हॉलिवूडच्या ‘मान्सून वेडिंग’, ‘द लीग ऑफ एक्स्ट्राऑडिनरी जन्टलमन्स’ यांसारख्या चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत.

  • हिंदी चित्रपटसृष्टीतील महानायक अमिताभ बच्चन यांनीही हॉलिवूडच्या ‘द ग्रेट गॅटसबे’ या चित्रपटात काम केले होते.
  • 7/13

    हिंदी चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक असलेल्या ओम पुरी यांनी हॉलिवूडच्या ‘सिटी ऑफ जॉय’, ‘इस्ट इज इस्ट’, ‘माय सन इज फॅन्टास्टिक’, ‘वुल्फ’, ‘चार्ली विल्सन्स वॉर’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

  • 8/13

    बॉलीवूड चाहत्यांसाठी मोगॅम्बो म्हणून ओळख असणाऱ्या अमरीश पूरी यांनी स्टीव्हन स्पीलबर्ग यांच्या ‘इंडियाना जॉन्स अॅन्ड द टेम्पल ऑफ डूम’ या चित्रपटात मोला राम ही व्यक्तिरेखा साकारली होती.

  • 9/13

    ऑस्करविजेत्या स्लमडॉग मिलेनिअर या चित्रपटातून देव पटेलला रातोरात प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर त्याने हॉलिवूडच्या ‘द लास्ट एअरबेंडर’, ‘द बेस्ट एक्झॉटिक मॅरीगोल्ड हॉटेल’, ‘अबाऊट चेरी’ यांसारख्या चित्रपटांतून काम केले.

  • 10/13

    ऑस्करविजेत्या स्लमडॉग मिलेनिएर चित्रपटातून रातोरात प्रसिद्धी मिळाल्यानंतर फ्रिडा पेंटो हॉलिवूडच्या ‘यु विल मीट अ टॉल डार्क स्ट्रेंजर’ , ‘राईज ऑफ द प्लॅनेट ऑफ दि एप्स’ , ‘इमॉर्टल्स’, ‘तृष्णा’ या चित्रपटांमध्ये दिसली.

  • 11/13

    ‘दिल्ली बेल्ली’ या चित्रपटातील कामाचे कौतूक झाल्यानंतर पुर्णा जगन्नाथन हिने आंतरराष्ट्रीय टेलिव्हिजन शोज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘लॉ अँड ऑर्डर’, ‘रॉयल पेन्स’ या मालिकांमध्ये काम केले. सध्या सुरू असलेल्या ‘हाऊस ऑफ कार्डस’मध्ये ती डॉक्टरची व्यक्तिरेखा साकारत आहे.

  • ‘लाईफ ऑफ पाय’ या चित्रपटातून सुरज शर्माने हॉलिवूडमध्ये नायक म्हणून प्रवेश मिळवून दिला.
TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentहॉलीवूडHollywood

Web Title: Priyanka chopra nimrat kaur aishwarya rai irrfan khan indian actors who have worked in hollywood

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.