Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. salman khan shah rukh khan aamir khan set a trend with religious accessories

बॉलीवूडमधील धार्मिक प्रतिकांचा वापर

अगदी सत्तरच्या दशकापासून हिंदी चित्रपटांतील नायक-नायिकांचा पेहराव, केशभुषा यापासून ते त्यांनी वापरलेल्या विशिष्ट गोष्टी त्या त्या काळात स्टेटस किंवा फॅशन सिम्बॉल म्हणून मिरवल्या गेल्या. चित्रपटातील नायक-नायिकांचे त्यांच्या चाहत्यांकडून अनुकरण करण्याची ही पद्धत काही बॉलीवूडमध्ये नवीन नाही. गेल्या काही वर्षांमध्ये बॉलीवूडमध्ये धार्मिक विषयांची पार्श्वभूमी असणारे अनेक चित्रपट येऊन गेले. यामध्ये नायकांनी वापरलेली धार्मिक प्रतिके बाजारपेठेत चांगलीच…

Updated: October 6, 2021 14:39 IST
Follow Us
  • अगदी सत्तरच्या दशकापासून हिंदी चित्रपटांतील नायक-नायिकांचा पेहराव, केशभुषा यापासून ते त्यांनी वापरलेल्या विशिष्ट गोष्टी त्या त्या काळात स्टेटस किंवा फॅशन सिम्बॉल म्हणून मिरवल्या गेल्या. चित्रपटातील नायक-नायिकांचे त्यांच्या चाहत्यांकडून अनुकरण करण्याची ही पद्धत काही बॉलीवूडमध्ये नवीन नाही. गेल्या काही वर्षांमध्ये बॉलीवूडमध्ये धार्मिक विषयांची पार्श्वभूमी असणारे अनेक चित्रपट येऊन गेले. यामध्ये नायकांनी वापरलेली धार्मिक प्रतिके बाजारपेठेत चांगलीच लोकप्रिय झालेली दिसली. अशाच काही 'फॅशन सिम्बॉल्स'वर टाकलेली नजर.
    1/8

    अगदी सत्तरच्या दशकापासून हिंदी चित्रपटांतील नायक-नायिकांचा पेहराव, केशभुषा यापासून ते त्यांनी वापरलेल्या विशिष्ट गोष्टी त्या त्या काळात स्टेटस किंवा फॅशन सिम्बॉल म्हणून मिरवल्या गेल्या. चित्रपटातील नायक-नायिकांचे त्यांच्या चाहत्यांकडून अनुकरण करण्याची ही पद्धत काही बॉलीवूडमध्ये नवीन नाही. गेल्या काही वर्षांमध्ये बॉलीवूडमध्ये धार्मिक विषयांची पार्श्वभूमी असणारे अनेक चित्रपट येऊन गेले. यामध्ये नायकांनी वापरलेली धार्मिक प्रतिके बाजारपेठेत चांगलीच लोकप्रिय झालेली दिसली. अशाच काही ‘फॅशन सिम्बॉल्स’वर टाकलेली नजर.

  • 2/8

    शाहरूख खान- ‘चलते चलते’ आणि ‘वीर-झारा’ यांसारख्या चित्रपटांत शाहरूखने पंजाबी तरूणाची व्यक्तिरेखा साकारली होती. या व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनावर ठसविण्यासाठी शाहरूखने गळ्यात विशिष्ट प्रकारचे लॉकेट परिधान केले होते.

  • 3/8

    सलमान खान- सलमान खानच्या नुकत्याच येऊन गेलेल्या बजरंगी भाईजान या चित्रपटात त्याच्या गळ्यात असणारे गदेचे लॉकेट सध्या तरूणांध्ये चांगलेच लोकप्रिय झाले आहे. चित्रपटातील सलमानची व्यक्तिरेखा अधिक प्रभावी करण्यासाठी संपूर्ण चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान या लॉकेटचा जाणीवपूर्वक वापर करण्यात आला होता.

  • 4/8

    आमिर खान- ‘रंगीला’, ‘लगान’ आणि ‘पीके’ या चित्रपटांतील व्यक्तीरेखा साकारताना आमिर खानकडून धार्मिक प्रतिकांचा वापर करण्यात आला होता.

  • 5/8

    ‘भाग मिल्खा भाग’ या चित्रपटात अभिनेता फरहान खानने शीख धर्मीयांचे प्रतीक असलेले लॉकेट गळ्यात घातले होते. या चित्रपटातील ‘मिल्खा सिंग’ यांची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी अशाप्रकारचे लॉकेट गळ्यात घालणे गरजेचे असल्याचे चित्रपटाचे दिग्दर्शक ओमप्रकाश मेहरा यांचे मत होते.

  • 6/8

    ‘हिरोपंती’ या चित्रपटात अभिनेता टायगर श्रॉफने गळ्यात तावीज घातले होते.

  • 7/8

    ‘बंगिस्तान’ या आगामी चित्रपटात अभिनेता पुलकित सम्राटने गळ्यामध्ये रुद्राक्षांची माळ आणि तावीज घातले आहे.

  • 8/8

    सिद्दार्थ मल्होत्रा- बॉलीवूडच्या आगामी ‘ब्रदर्स’ या चित्रपटासाठी अभिनेता सिद्दार्थ मल्होत्राने त्याच्या मानेभोवती धार्मिक प्रार्थना गोंदवून घेतली आहे.

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentसलमान खानSalman Khan

Web Title: Salman khan shah rukh khan aamir khan set a trend with religious accessories

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.