-
२००९ मध्ये ‘३ इडियट्स’ या बॉलिवूड चित्रपटाच्या यशानंतर, लडाखमधील सोनम वागंचुक यांचे नाव चर्चेत आले. आमिर खानने साकारलेल्या फुंशुख वांगडूच्या व्यक्तिरेखेमागील प्रेरणा म्हणून सोनम वांगचुक यांना पाहिले जाते.
-
नुकतेच लडाखमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या केंद्रस्थानी आता सोनम वांगचुक आहेत. लडाखमध्ये या हिंसाचारात चार जणांचा मृत्यू झाला आहे. सोनम वांगचुक यांनीच जमावाला चिथावणी दिल्याने हिंसाचार झाल्याचा आरोप केंद्र सरकारने केला.
-
५९ वर्षीय सोनम वांगचुक यांचा जन्म लेह जवळील उलेतोकपो गावात झाला. वृत्तानुसार, त्यांच्या गावात शाळा नसल्याने वयाच्या नऊ वर्षांपर्यंत त्यांना घरीच शिक्षण देण्यात आले.
-
१९७५ मध्ये, सोनम वांगचुक यांचे वडील सोनम वांग्याल जम्मू आणि काश्मीर सरकारमध्ये मंत्री झाले आणि त्यांचे कुटुंब श्रीनगरला गेले. सोनम वांगचुक यांनी श्रीनगरमधील एका शाळेत प्रवेश घेतला, जिथे इंग्रजी, हिंदी आणि उर्दूमध्ये धडे दिले जात होते आणि सोनम वांगचुक यांना यातील एकही भाषा समजत नव्हती.
-
काही मुलाखतींमध्ये, सोनम वांगचुक यांनी सांगितले आहे की, शिक्षक त्यांना अनेकदा वर्गाबाहेर ठेवत असत आणि यामुळे त्यांना अपमानित वाटायचे. “श्रीनगरमध्ये, मी लडाखचा एक मुका मुलगा होतो ज्याला हिंदी किंवा इंग्रजी बोलता येत नव्हते. माझा अपमान झाल्यामुळे मला आत्महत्या करण्याचे विचार यायचे”, असे त्यांनी द वीकला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
-
तीन वर्षांनंतर, १२ वर्षांच्या सोनम वांगचुक यांनी श्रीनगरमध्ये शिक्षण घेऊ इच्छित नसल्याने दिल्लीला पोहोचले. तिथे त्यांनी दिल्लीतील विशेष केंद्रीय विद्यालयाच्या प्राचार्याकडे विनंती केली आणि प्रवेश मिळवला.
-
शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर सोनम वांगचुक पुन्हा श्रीनगरला आले आणि एनआयटी श्रीनगरमध्ये अभियांत्रिकीमध्ये पदवी मिळवली.
-
१९८८ मध्ये, कॉलेजमधून नुकतेच बाहेर पडलेल्या सोनम वांगचुक यांनी त्यांच्या भावांसोबत आणि इतर पाच जणांसोबत मिळून स्टुडंट्स एज्युकेशनल अँड कल्चरल मूव्हमेंट ऑफ लडाखची स्थापना केली.
-
सोनम वांगचुक यांना शिक्षणतज्ज्ञ आणि पर्यावरण कार्यकर्ते म्हणूनही ओळखले जाते. त्यांच्या सामाजिक कार्यासाठी रॅमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. (All Photos: @Wangchuk66/X)
सोनम वांगचुक यांची शैक्षणिक पार्श्वभूमी काय आहे? त्यांच्याच जीवनावर आधारित आहे ३ इडियट्स
Sonam Wangchuk Education: शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर सोनम वांगचुक पुन्हा श्रीनगरला आले आणि एनआयटी श्रीनगरमध्ये अभियांत्रिकीमध्ये पदवी मिळवली.
Web Title: Sonam wangchuk education 3 idiots real story ladakh protest aam