• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. rahul dravid played 12 matches from scotland scored 600 runs abn

भारताव्यतिरिक्त अन्य देशाकडून खेळला आहे ‘हा’ खेळाडू; जाणून घ्या १२ सामन्यांत ६०० धावा करणाऱ्या ‘या’ खेळाडूबद्दल

या खेळाडूने भारतासाठी आपल्या कारकिर्दीत २४ हजाराहून अधिक आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत

November 4, 2021 18:12 IST
Follow Us
  • याशिवाय राहुल द्रविड स्कॉटलंडसाठी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यामध्येही खेळला होता. मात्र या सामन्यात तो खाते न उघडता पहिल्याच चेंडूवर बाद झाला. पाकिस्तानने हा सामना अगदी सहज जिंकला. अशा प्रकारे राहुल द्रविडने स्कॉटलंडसाठी एकूण १२ सामने खेळले.भारतीय क्रिकेटच्या इतिहासात अशी अनेक नावे आली आहेत, जी विसरणे कठीण आहे, पण काही नावे अशी आहेत ज्यांनी केवळ भारतातच नाही तर परदेशातही नाव कमावले आहे. (Source: Reuters)
    1/15

    याशिवाय राहुल द्रविड स्कॉटलंडसाठी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यामध्येही खेळला होता. मात्र या सामन्यात तो खाते न उघडता पहिल्याच चेंडूवर बाद झाला. पाकिस्तानने हा सामना अगदी सहज जिंकला. अशा प्रकारे राहुल द्रविडने स्कॉटलंडसाठी एकूण १२ सामने खेळले.भारतीय क्रिकेटच्या इतिहासात अशी अनेक नावे आली आहेत, जी विसरणे कठीण आहे, पण काही नावे अशी आहेत ज्यांनी केवळ भारतातच नाही तर परदेशातही नाव कमावले आहे. (Source: Reuters)

  • 2/15

    असेच एक मोठे नाव आहे ज्याने भारतासाठी आपल्या कारकिर्दीत २४ हजाराहून अधिक आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत, पण स्कॉटलंडसाठी देखील या दिग्गजाने १२ सामने खेळले आहेत. (File Photo/BCCI)

  • 3/15

    स्कॉटलंडसाठी १२ एकदिवसीय सामने खेळणाऱ्या या भारतीय दिग्गजाला ‘द वॉल’ ही म्हणतात. म्हणजेच राहुल द्रविड. (BCCI)

  • 4/15

    बीसीसीआयने बुधवारी राहुल द्रविडची भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. भारताव्यतिरिक्त राहुल द्रविडने स्कॉटलंडकडून १२ एकदिवसीय सामने खेळले आहेत.

  • 5/15

    २००३ च्या विश्वचषकानंतरचा जेव्हा भारतीय संघ आयसीसी स्पर्धेत उपविजेते म्हणून परतली होती. त्यावेळी राहुल द्रविड संघाचा उपकर्णधार होता आणि सौरव गांगुली कर्णधार होता. त्याच वेळी, न्यूझीलंडचे दिग्गज जॉन राइट मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी सांभाळत होते.

  • 6/15

    स्कॉटिश क्रिकेट युनियनचे मुख्य कार्यकारी ग्वेन जोन्स यांनी त्यावेळी जॉन राइट यांना विनंती केली आणि मार्की ओव्हरसीज प्लेयर नियमाद्वारे भारतीय क्रिकेटपटूची मागणी केली होती. जो स्कॉटलंड क्रिकेट संघाला मदत करू शकेल आणि नवीन गोष्टी शिकवू शकेल अशा खेळाडूची त्यांनी विनंती केली.

  • 7/15

    त्यावेळी स्कॉटिश सॉल्टियर्सना तीन वर्षांच्या चाचणी कालावधीसाठी नॅशनल लीगमध्ये बढती देण्यात आली होती. जॉन राईट यांना ही जबाबदारी सचिन तेंडुलकरला द्यायची होती पण त्याचवेळी त्यांनी राहुल द्रविडलाही ही जबाबदारी दिली.(फोटो सौजन्य – Reuters)

  • 8/15

    त्यावेळी राहुल द्रविडचे नुकतेच पत्नी विजेता द्रविडशी लग्न झाले होते. त्यामुळे त्यांना कुठेतरी जाण्यासाठी वेळ काढायचा होता.  त्यामुळे त्यांनी तीन महिन्यांच्या कराराला मान्यता दिली. (फोटो सौजन्य – archive indianexpress)

  • 9/15

    माध्यमांच्या वृत्तानुसार, त्यावेळी राहुल द्रविडने ४५ हजार पौंडमध्ये हा करार केला होता.

  • 10/15

    यानंतर राहुल पत्नीसह स्कॉटलंडला पोहोचला. तेथे त्याने स्कॉटलंडसाठी ११ एकदिवसीय सामने खेळले. हे सर्व सामने वेगवेगळ्या काऊंटी संघांविरुद्ध होते. राहुल द्रविडने सर्व सामन्यांमध्ये ६६.६६ च्या सरासरीने ६०० धावा केल्या.(फोटो सौजन्य- ट्विटर/Youtube)

  • 11/15

    याशिवाय राहुल द्रविड स्कॉटलंडसाठी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यामध्येही खेळला होता. मात्र या सामन्यात तो खाते न उघडता पहिल्याच चेंडूवर बाद झाला. पाकिस्तानने हा सामना अगदी सहज जिंकला. अशा प्रकारे राहुल द्रविडने स्कॉटलंडसाठी एकूण १२ सामने खेळले.

  • 12/15

    राहुल द्रविडने भारतीय संघासाठी १६४ कसोटी सामने, ३४४ एकदिवसीय सामने आणि एक टी-२० सामना खेळला आहे. (Express archive photo)

  • 13/15

    राहुल द्रविडने कसोटीत ५२.३१ च्या सरासरीने १३२८८ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर त्याच्या नावावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये ३९.१७ च्या सरासरीने १०८८९ धावांची नोंद आहे. (Source: Express Archive)

  • 14/15

    याशिवाय, एकमेव टी२० सामन्यात राहुल द्रविडने ३१.०० च्या सरासरीने आणि १४७.६२ च्या उत्कृष्ट स्ट्राइक रेटने ३१ धावा केल्या. (Source: Express Archive)

  • 15/15

    आयपीएलच्या ८९ सामन्यांमध्ये राहुल द्रविडने २८.३३ च्या सरासरीने आणि ११५.५२ च्या स्ट्राईक रेटने २१७४ धावा केल्या आहेत. (Reuters)

TOPICS
टीम इंडियाTeam Indiaराहुल द्रविडRahul Dravidसचिन तेंडुलकरSachin Tendulkar

Web Title: Rahul dravid played 12 matches from scotland scored 600 runs abn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.