-
भारताचा स्टार क्रिकेटर फलंदाज रॉबिन उथप्पा पुन्हा एकदा बाबा होणार आहे. रॉबिनने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही गोड बातमी चाहत्यांना दिली आहे.
-
रॉबिनने पत्नी शितलचे मॅटर्निटी फोटोशूटचे फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
-
रॉबिन पत्नी शितलसोबत ३ मार्च २०१६ रोजी विवाहबंधनात अडकला.
-
त्यानंतर २०१७ मध्ये शितलने चिमुकल्याला जन्म दिला.
-
रॉबिन-शितलच्या मुलाचं नाव ‘नील’ असं आहे.
-
लवकरच हे दोघे पुन्हा एकदा आई-बाबा होणार आहेत.
-
नव्या पाहुण्याचं स्वागत करण्यासाठी रॉबिन-शितल उत्सुक आहेत.
-
रॉबिन उथप्पा आंतरराष्ट्रीय क्रिकेटरमध्ये भारताकडून खेळला आहे.
-
यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाकडून रॉबिनने चांगली कामगिरी केली होती.
-
रॉबिन, पत्नी शितल आणि मुलगा नीलसोबत.
-
रॉबिनच्या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो : रॉबिन उथप्पा / इन्स्टाग्राम)
Photos : CSK चा ‘हा’ क्रिकेटर पुन्हा होणार बाबा; पोस्ट शेअर करत दिली गोड बातमी
चेन्नई सुपर किंग्सच्या खेळाडूने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही गोड बातमी चाहत्यांना दिली आहे.
Web Title: Indian cricketer chennai super kings batsman robin uthappa will become daddy soon share good news photos kak