-
ऑस्ट्रेलियामध्ये टी२० विश्वचषक सुरु असलेल्या १५ सदस्यीय टीम इंडियासोबत १६ जणांचा मदतीला स्टाफ सुद्धा दिमतीला आहे. त्यामध्ये केवळ एकच महिला असून सध्या ती चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. तिचे नाव राजलक्ष्मी अरोरा आहे.
-
भारतीय संघासोबत ऑस्ट्रेलियाला गेलेली मिस्ट्री गर्ल राजलक्ष्मी आरोराच्या नावाची चर्चा सुरु झालीय. तिचे टीम इंडियासोबतचे काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. राजलक्ष्मी अरोराचे तिचं टोपण नाव राजल अरोडा आहे. ती गेल्या अनेक वर्षांपासून टीम इंडियासोबत प्रवास करत असते. दरम्यान, भारताच्या १६ सदस्यीय स्टाफमध्ये राजलक्ष्मी अरोरा हिचाही समावेश आहे.
-
ऑस्ट्रेलियात रंगणाऱ्या टी२० विश्वचषकातील भारतानं सुपर-१२ मधील ५ सामने झाले असून उपांत्य फेरीत भारताचे स्थान जवळपास निश्चित झाले आहे. टीम इंडियासोबत १६ सदस्यांचा स्टाफही ऑस्ट्रेलियात सध्या विश्वचषक खेळत असलेल्या खेळाडूंच्या मदतीला आहे. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडसह सहाय्यक प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफची ऑस्ट्रेलियात आहेत. या सर्वांच्या संघात वेगवेगळ्या भूमिका आहेत.
-
राजलक्ष्मी अरोराचा टीम इंडियाच्या बॅकरूम स्टाफमध्ये समावेश आहे. ती गेल्या अनेक वर्षांपासून टीम इंडियासोबत फिरत आहे. राजलक्ष्मी भारतीय क्रिकेट नियामक मंडळात सीनियर मीडिया प्रोड्यूसर आहे. ती भारतीय संघ, खेळाडू आणि बोर्ड अधिकारी आणि चाहते यांच्यातील नातं दृढ करण्याचं काम करते.
-
राजलक्ष्मीची २०१९ मध्ये बीसीसीआयच्या चार सदस्यीय अंतर्गत समितीची प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. तेव्हापासून ती मंडळाशी जोडली गेली यादरम्यान ती भारतीय खेळाडूंवरील गैरवर्तन आणि भारतीय खेळाडूंच्या वर्तनावर लक्ष ठेवायची.
-
आता तिच्यावर सिनिअर मीडिया प्रोड्युसरची जबाबदारी सोपवण्यात आलीय. याशिवाय, भारतातील सर्वात लोकप्रिय लीग आयपीएलच्या अनेक हंगामात मीडिया मॅनेजर म्हणूनही दिसली.
-
राजलक्ष्मी अरोराने पुण्यातील सिम्बॉयसेस इंस्टिट्युट ऑफ मीडिया अँड कम्युनिकेशनमधून मीडियाचं शिक्षण घेतलं होतं. राजलक्ष्मी अरोडाने रिवरडेल हायस्कूलमधून शिक्षण घेतलं होतं. त्यानंतर शाळेच्या बास्केटबॉल आणि शूटिंग संघांचीही सदस्य राहिली होती.
-
राजलक्ष्मीनं तिच्या व्यावसायिक करिअरची सुरुवात कंटेंट रायटर म्हणून केली. राजलक्ष्मी अरोरा हिला २०१९ मध्ये बीसीसीआयच्या चार सदस्यीय अंतर्गत समिती (आयसी)च्या प्रमुखच्या रूपात नामांकित केले होते. राजलक्ष्मी अरोरा बीसीसीआयच्या अंतर्गत तक्रार समितीचीही प्रमुक होती.
-
ती जरी क्रिकेट खेळली नसली तरी तिने शाळेत असताना बास्केटबॉल आणि शूटिंगमध्ये आपला हात आजमावला आहे. ती सोशल मीडियावर देखील चांगलीच अॅक्टिव्ह असते. इन्स्टाग्रामवर तिचे ४८ हजाराच्या वर फॉलोअर्स आहेत.
T20 World Cup 2022: अप्सरा पेक्षाही सुंदर दिसणारी राजलक्ष्मी अरोरा, भारतीय संघातील एकमेव महिला स्टाफ
ऑस्ट्रेलियामध्ये टी२० विश्वचषक सुरु असलेल्या १५ सदस्यीय टीम इंडियासोबत १६ जणांचा मदतीला स्टाफ सुद्धा दिमतीला आहे. त्यामध्ये केवळ एकच महिला असून सध्या ती चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. जाणून घेऊयात तिच्याविषयी.
Web Title: T20 world cup 2022 rajalakshmi arora looks more beautiful than a nymph the only female staff in the indian team avw