• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. ind vs nz kane williamson hardik pandya enjoy a rickshaw safari before the series begins avw

IND vs NZ: केन विलियम्सन – हार्दिक पांड्या यांनी मालिका सुरु होण्यापूर्वी घेतला रिक्षा सफारीचा आनंद

भारत वि. न्यूझीलंड द्विपक्षीय टी२० मालिका १८ नोव्हेंबर शुक्रवार पासून सुरु होणार असून त्याआधी दोन्ही संघांच्या कर्णधारांचे फोटोशूट पार पडले.

November 17, 2022 23:10 IST
Follow Us
  • IND vs NZ: Kane Williamson - Hardik Pandya enjoy a rickshaw safari before the series, begins
    1/9

    १८ नोव्हेंबर पासून सुरु होणाऱ्या मालिकेआधी भारतीय संघाचा कर्णधार हार्दिक पांड्या आणि न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विलियम्सन यांनी वेलिंग्टन च्या स्काय स्टेडियमजवळ फोटोशूट केले.

  • 2/9

    या फोटोशूट दरम्यान स्काय स्टेडीयम जवळच्या रस्त्यावर दोन्ही संघाच्या कर्णधारांनी एका खास रिक्षाने सफारी करण्याचा आनंद लुटला.

  • 3/9

    हार्दिक पांड्या आणि केन विलियम्सन या रिक्षात एकत्र बसले आणि त्यांनी ती स्वतः चालवली. यानंतर दोघेही टी२० ट्रॉफीजवळ पोहोचले, तिथे स्टेडियमच्या बाजूला फोटो देखील काढण्यात आला.

  • 4/9

    हार्दिक-केनने ज्या रिक्षात बसून फोटोशूट केले तिला ‘क्रोकोडाइल बाइक’ म्हणतात. न्यूझीलंडच्या आल्हाददायक वातावरणात मित्र आणि कुटुंब सहलीसाठी बाहेर पडल्यावर या रिक्षाचा आनंद घेतात.

  • 5/9

    भारत वि. न्यूझीलंड द्विपक्षीय टी२० मालिकेत हार्दिक पांड्यावर कर्णधारपदाची तर व्ही.व्ही. एस. लक्ष्मण याच्या खांद्यावर प्रशिक्षक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

  • 6/9

    हार्दिक पांड्याकडे टीम इंडियाचा टी२० संघासाठी भविष्यकाळातील कायमस्वरूपी कर्णधाराच्या दृष्टीने बघितले जाते.

  • 7/9

    ऋषभ पंत आणि संजू सॅमसन यांच्याकडे स्वत:ला भारतीय संघातील सर्वोत्तम फिनिशर आणि यष्टीरक्षक म्हणून सिद्ध करण्यासाठी ही एक उत्तम संधी असणार आहे.

  • 8/9

    गोलंदाजीचा विचार केल्यास भारताचा लेग-स्पिनर युजवेंद्र चहल आणि डावखुरा रिस्ट स्पिनर कुलदीप यादव म्हणजेच ‘कुलचा जोडी’ यांच्यावर खरी टीम इंडियाची भिस्त असणार आहे.

  • 9/9

    अनकॅप्ड इशान किशन आणि शुभमन गिल हे टी२० फॉरमॅटमधील पहिल्या सामन्याचे संभाव्य सलामीवीर असू शकतात. फलंदाजीतील प्रयोग सुरू असताना या वर्षी त्यांना सलामीवीर म्हणून न्यूझीलंडमध्ये ठसा उमटवण्याची नामी संधी चालून आली आहे.

TOPICS
केन विल्यमसनKane Williamsonटी 20T20भारत विरुद्ध न्यूझीलंडIndia vs New Zealandहार्दिक पांड्याHardik Pandya

Web Title: Ind vs nz kane williamson hardik pandya enjoy a rickshaw safari before the series begins avw

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.