-
कपिल देव यांचे पुर्ण नाव कपिल देव रामलाल निखंज असे असून त्यांचा जन्म ६ जानेवारी १९५९ मध्ये चंदीगढ येथे झाला. त्यांचे वडील रामलाल हे बिल्डींग आणि टिंबर कॉन्ट्रॅक्टर होते. (फोटो-सौजन्य ट्विटर)
-
कपिल यांनी १९८३ च्या विश्वचषकात ३०३ धावा आणि १२ विकेट घेतल्या होत्या. तसेच ८ सामन्यात ७ झेलही घेतले होते. त्याचबरोबर या विश्वचषकात त्यांनी झिम्बाब्वे विरुद्ध १७५ धावांची नाबाद खेळी देखील केली होती. (फोटो-सौजन्य ट्विटर)
-
कपिल देव यांचे पालक भारत-पाकिस्तान फाळणीवेळी रावळपिंडीहून स्थलांतरित झाले होते. कपिल देव यांना त्यांच्या १६ वर्षांच्या कारकिर्दीत कधीही दुखापतीमुळे सामन्यातून वगळण्यात आले नाही. (फोटो-सौजन्य ट्विटर)
-
एकदिवसीय फॉरमॅटमध्ये ६ व्या क्रमांकावर फलंदाजी करताना कपिलने सर्वाधिक धावा केल्याचा विक्रम जगभरातील कोणत्याही खेळाडूच्या नावावर नाही. त्याने एका सामन्यात नाबाद १७५ धावा केल्या आहेत. (फोटो-सौजन्य ट्विटर)
-
कपिल देव ऑक्टोबर १९९९ ते ऑगस्ट २००० पर्यंत भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक राहिले आहेत. पण त्यावेळी मॅच फिक्सिंग प्रकरण गाजल्यानंतर त्यांनी आपल्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. (फोटो-सौजन्य ट्विटर)
-
कपिल देव यांनी क्रिकेट व्यतिरिक्त काही चित्रपटात गेस्ट ऍपिएरन्स दिला आहे. यात मुझसे शादी करोगी, आर्यन: अनब्रेकेबल, चेन कूली की मेन कूली आणि इक्बाल या चित्रपटांचा समावेश आहे. (फोटो-सौजन्य ट्विटर)
-
सचिन तेंडुलकर म्हणाला, एका दहा वर्षाच्या मुलाने कपिल देव यांना १९८३ चा विश्वचषक जिंकताना पाहिले आणि भारतासाठी दुसरा विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न पाहू लागला. तो मुलगा मी होतो. कपिल पाजी, वाढदिवसाच्या शुभेच्छा! आपण लाखो लोकांना प्रेरणा देत रहा. (फोटो-सौजन्य ट्विटर)
-
तीन आत्मचरित्र लिहिले असून ‘गॉड डेक्री’ हे पहिले आत्मचरित्र १९९८५ मध्ये प्रकाशित झाले. त्यानंतर ‘क्रिकेट माय स्टाइल’ हे आत्मचरित्र १९८७ ला प्रकाशित झाले. त्यानंतर त्यांनी २००४ मध्ये ‘स्ट्रेट फ्रॉम द हार्ट’ हे आत्मचरित्र प्रकाशित केले. (फोटो-सौजन्य ट्विटर)
-
कपिल देव हे त्यांच्या कसोटी कारकिर्दीत १८४ डावात कधीही धावबाद झालेले नाही. सर्वाधिक सलग डावात धावबाद न होण्याचा विक्रम अजूनही त्यांच्या नावावर आहे. (फोटो-सौजन्य ट्विटर)
Kapil Dev Birthday Special: टीम इंडियाला पहिला विश्वचषक जिंकून देणाऱ्या कर्णधाराबद्दल जाणून घ्या ‘या’ खास गोष्टी
Kapil Dev todays 64th Birthday: कपिल देव आज त्यांचा ६४ वा वाढदिवस साजरा करत आहेत. या माजी कर्णधारानी भारतीय क्रिकेटला ते नाव आणि आदर मिळवून दिला आहे. जे कोणीही आणि कधीही विसरू शकत नाही.
Web Title: Kapil dev todays 64th birthday know some special facts about 1983 world cup winning captain vbm