-
रोहित शर्मा पहिल्यांदाच बॉर्डर-गावसकर ट्रॉफीचे नेतृत्व करण्यासाठी सज्ज झाला आहे. गेल्या वर्षी त्याला भारतीय कसोटी संघाचे कर्णधारपद मिळाले. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ४ सामन्यांची कसोटी मालिका ९ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. (फोटो- संग्रहित छायाचित्र इंडियन एक्सप्रेस)
-
टीम इंडियासाठी ही मालिका खूप महत्त्वाची आहे. यात भारतीय संघ पराभूत झाला तर जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतून बाहेर पडेल. सध्या संघ गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाचा संघ चांगली कामगिरी करत गुणतालिकेत अव्वल स्थानावर कायम आहे. (फोटो- संग्रहित छायाचित्र इंडियन एक्सप्रेस)
-
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीचा विक्रम पाहिल्यास, येथेही एमएस धोनीने सर्वाधिक सामन्यांमध्ये कर्णधारपदी राहण्याव्यतिरिक्त सर्वाधिक सामने जिंकले आहेत. धोनीने १३ कसोटीत कर्णधारपद भूषवले. ८ जिंकले आहे तर ४ गमावले आहेत. (फोटो- संग्रहित छायाचित्र इंडियन एक्सप्रेस)
-
एक कसोटी अनिर्णित राहिली. इतर कोणत्याही कर्णधाराने ५ पेक्षा जास्त कसोटी जिंकल्या नाहीत.ऑस्ट्रेलियाचा मायकेल क्लार्क आणि स्टीव्ह वॉ विजयांच्या बाबतीत संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहेत. (फोटो- संग्रहित छायाचित्र इंडियन एक्सप्रेस)
-
दोघांनी कर्णधार म्हणून ५-५ कसोटी जिंकल्या आहेत. क्लार्कने ८ कसोटीत ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व केले, तर वॉने १० कसोटी सामन्यांमध्ये त्यांचे नेतृत्व केले आहे. (फोटो- संग्रहित छायाचित्र इंडियन एक्सप्रेस)
-
माजी भारतीय कर्णधार विराट कोहली, सौरव गांगुली आणि अजिंक्य रहाणे हे तिघेही संयुक्तपणे तिसऱ्या क्रमांकावर आहेत आणि त्यांनी ३-३ कसोटी जिंकल्या आहेत. कोहलीने १० पैकी ३, गांगुलीने ९ पैकी ३ तर रहाणेने ४ पैकी ३ कसोटी जिंकल्या आहेत. (फोटो- संग्रहित छायाचित्र इंडियन एक्सप्रेस)
-
सध्याच्या मालिकेत रोहित शर्मा आणि पॅट कमिन्स यांच्याकडे आपापल्या संघाची कमान आहे. दोन्ही खेळाडू बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये प्रथमच कर्णधारपद भूषवताना दिसणार आहेत. (फोटो- संग्रहित छायाचित्र इंडियन एक्सप्रेस)
-
अनिल कुंबळे आणि सचिन तेंडुलकर यांनीही कर्णधार म्हणून भारताकडून प्रत्येकी एक कसोटी सामना जिंकला आहे.जर आपण रोहित शर्माच्या एकूण कसोटी विक्रमावर नजर टाकली तर त्याने २ सामन्यात कर्णधारपद भूषवले आहे आणि दोन्ही जिंकले आहेत. (फोटो- संग्रहित छायाचित्र इंडियन एक्सप्रेस)
-
पॅट कमिन्सने कर्णधार म्हणून १३ पैकी ८ कसोटी जिंकल्या आहेत. एकात पराभव झाला आहे, तर ४ सामने अनिर्णित राहिले आहेत. (फोटो- संग्रहित छायाचित्र इंडियन एक्सप्रेस)
IND vs AUS: बॉर्डर-गावसकर ट्रॉफीवर आजही एमएस धोनीचे वर्चस्व; कोहलीसह इतर कर्णधार कोणत्या क्रमांकावर? घ्या जाणून
Border Gavaskar Trophy: एमएस धोनीने काही वर्षांपूर्वी कसोटी क्रिकेटला अलविदा केला आहे. पण तरीही तो बॉर्डर-गावसकर ट्रॉफीवर राज्य करतो. भारत आणि ऑस्ट्रेलिया आणखी एक मोठी मालिका खेळण्यासाठी सज्ज झाले आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया ९ फेब्रुवारीपासून ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी सज्ज झाली आहे.
Web Title: Ms dhoni has dominated the border gavaskar trophy till date and see where virat and rohit rank vbm